लासलगाव : देशांतर्गत कांद्याचे किरकोळ बाजारात वाढते बाजार भाव कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली. देशांतर्गत बाजारात कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या होलसेल व्यापाऱ्यांकडे कांद्याच्या साठ्यावर ५०० क्विंटल तर किरकोळ व्यापाºयांकडे १०० क्विंटल पर्यंत साठवणूक करण्याची मर्यादा आणल्याने लासलगाव बाजार समितीत सुरू झालेल्या लिलावानंतर कांद्याच्या सरासरी बाजार भावात ६०० रु पयांची शुक्र वारच्या तुलनेत घसरण झाल्याने संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडले. यादरम्यान बाजार समितीच्या आवाराबाहेर लासलगाव-पिंपळगाव रस्त्यावर रस्ता रोको करण्यासाठी आलेल्या शेतकºयांना दंडुका दाखवून पोलिसांनी माघारी पिटाळून लावल्याने कांदा उत्पादक शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.मध्य प्रदेशातील कांदा संपुष्टात आल्याने तसेच मुसळधार पावसाने दक्षिणेकडे लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे राज्यातील उन्हाळ कांद्याच्या मागणीत वाढ झाल्याने कांद्याचे बाजार भाव वाढण्यास सुरु वात झाली. कांद्याच्या बाजारभावात होत असलेली वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने कांदा आयात करणे, कांद्यावरील निर्यात मूल्य शुल्कात साडेआठशे डॉलरपर्यंत वाढ केली, मात्र कांद्याचे बाजार भाव खाली येत नसल्याने केंद्र सरकारच्या आलेल्या पथकाच्या अहवालानंतर तातडीने कांदा निर्यात बंदी, व्यापाºयांच्या साठ्यावर मर्यादा आणल्याने आशिया खंडातील अग्रेसर असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव कांदा बाजार आवारात सहा वाहनातील लिलावाला सरासरी ३०६५ रु पये, जास्तीजास्त ३३५१ रु पये तर कमीतकमी २६०१ रु पये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाल्याने शुक्र वारच्या तुलनेत सहाशे रु पयांची घसरण झाल्याने लासलगाव येथे कांद्याचे लिलाव शेतकºयांनी बंद पाडले.चौकट.....गेल्या दोन-तीन वर्षानंतर कांद्याला चांगले बाजार भाव यंदा मिळत असताना केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घाईगर्दीत निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दक्षिणेकडून नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाल्याने तसेच येणाºया तीन आठवड्यानंतर राज्यातील पुणे, चाकण, नगर आणि नाशिक विभागातून लाल कांद्याची आवक सुरू होणार असताना हा निर्णय का घेतला गेला असा सवाल आता व्यापारी वर्गातून उपस्थित होऊ लागला आहे.कांद्याच्या वाढत्या बाजार भावातून शहरी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा अन्यथा येणाºया दिवसात तीव्र आंदोलनाला करण्याचा इशारा देत विधानसभेच्या निवडणुकीत मोठा फटका ग्रामीण भागातून मताच्या रु पात या सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही.- राजेंद्र डोखळे, शेतकरी नेते, लासलगाव.कांदा निर्यात बंदी, व्यापाºयांनी जवळ खरेदी केलेल्या साठ्यात आणलेले निर्बंध यामुळे सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजार भावात मोठी घसरण होण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता असल्याने लासलगाव बाजार समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री, वाणिज्य मंत्री आणि पंतप्रधान यांना निवेदन देऊन या निर्णयाचा फेरविचार करावा.- उमेश पारीक, लासलगाव.
निर्यातबंदी अन् कांदा साठ्यावर मर्यादा घातल्याने ६०० रु पयांची लासलगाव बाजार समितीत घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 5:24 PM
लासलगाव : देशांतर्गत कांद्याचे किरकोळ बाजारात वाढते बाजार भाव कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली. देशांतर्गत बाजारात कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या होलसेल व्यापाऱ्यांकडे कांद्याच्या साठ्यावर ५०० क्विंटल तर किरकोळ व्यापाºयांकडे १०० क्विंटल पर्यंत साठवणूक करण्याची मर्यादा आणल्याने लासलगाव बाजार समितीत सुरू झालेल्या लिलावानंतर कांद्याच्या सरासरी बाजार भावात ६०० रु पयांची शुक्र वारच्या तुलनेत घसरण झाल्याने संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडले. यादरम्यान बाजार समितीच्या आवाराबाहेर लासलगाव-पिंपळगाव रस्त्यावर रस्ता रोको करण्यासाठी आलेल्या शेतकºयांना दंडुका दाखवून पोलिसांनी माघारी पिटाळून लावल्याने कांदा उत्पादक शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देशेतकºयांना दंडुका दाखवून पोलिसांनी माघारी पिटाळून लावल्याने कांदा उत्पादक शेतकºयांनी नाराजी