लासलगाव : येथील कांदा बाजारपेठेत कांद्याच्या दरात २५० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतित भर पडली आहे.जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्याचा सर्वच क्षेत्रात मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. त्याचा कांद्याच्या दरावरही परिणाम झाला आहे. शासनाने १५ मार्चपासून कांदा निर्यातबंदी मागे घेतल्याने कांद्याचे दर वाढतील अशी आशा होती, मात्र कोरोनामुळे दर घसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. शनिवारच्या तुलनेत सोमवारी (दि. १६) लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात २५० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली.कांदा निर्यात खुली करावी यासाठी नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलने केली. केंद्र सरकारने निर्यात खुली केली. त्यानुसार १५ मार्चपासून कांद्याची निर्यात बांग्लादेश, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, दुबई आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये सुरू झाली. मात्र सध्या भारतासह जगभरात कोरोनाने मोठा धुमाकूळ घातला आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या निर्यातीवरही दिसून येत आहे.लासलगाव बाजार समितीत १६०० वाहनांतून ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त १७९०, कमीत कमी १००० तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लाल कांद्याला कमाल १७८०, कमीत कमी ९००, तर सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला, अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. गेल्या १३ दिवसांपूर्वी कांद्यावरील निर्यातबंदी उठणार असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून कांद्याचे बाजारभाव वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठवला. बाजार समितीत कांद्याची एकाच वेळी मोठी आवक झाल्याने दर प्रतिक्विंटल २५० रु पयांनी घसरले. कांदा निर्यातप्रक्रि या सुरळीत होण्याबाबतची अधिसूचना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने संकेतस्थळावर जाहीर केली होती. त्यात निर्यात करताना पतपत्र, किमान निर्यातमूल्य नसल्याचे जाहीर करण्यात आले. पाच महिन्यांनंतर कांदा निर्यात सुरळीत होणार असल्याने जिल्ह्यातील व्यापाºयांनी कांदा माल बंदरावर पाठवायला सुरु वात केली आहे.कांद्याला दुबई, ओमान, मस्कतसह दक्षिण आशियामधील सिंगापूर, मलेशिया व श्रीलंका या देशातून मागणी आहे. निर्यात उठविण्याची घोषणा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मालाची चौकशी होऊ लागल्यानंतर स्थानिक व्यापाºयांनी त्या अनुषंगाने तयारी करून माल पाठवायला सुरुवात केली आहे. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, कळवण, नामपूर आदी बाजारातील व्यापाºयांनी तयारी पूर्ण केली आहे.
लासलगावी कांदा दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 10:03 PM
लासलगाव : येथील कांदा बाजारपेठेत कांद्याच्या दरात २५० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतित भर पडली आहे. जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्याचा सर्वच क्षेत्रात मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. त्याचा कांद्याच्या दरावरही परिणाम झाला आहे. शासनाने १५ मार्चपासून कांदा निर्यातबंदी मागे घेतल्याने कांद्याचे दर वाढतील अशी आशा होती, मात्र कोरोनामुळे दर घसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
ठळक मुद्देकोरोना : आवक वाढली; निर्यातबंदी उठवूनही शेतकरी चिंतित