लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळा व लाल कांद्याची आवक वाढली असून, उन्हाळा कांदा ७००, तर लाल कांदा दरात ४०० रुपयांची घसरण झाली. बाजारभाव कमी झाल्याने कांदा उत्पादकांच्या गोटात संताप व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी (दि.२६) बाजार समिती आवारात ९९७ वाहनातील उन्हाळ कांद्याला ११ हजार ९५ क्विंटल ८०१ ते ३,७२० व सरासरी २,९०० रुपये, तर १,१४५ क्विंटल लाल कांद्याला किमान ९०० ते ४,५०० रुपये व सरासरी ३,५०१ रुपये दर मिळाला. बुधवारी (दि.२५) उन्हाळा कांदा ४,२३० रुपये, तर लाल कांदा ४,९०० रुपये दराने विक्री झाला होता.