लासलगाव : बकरी ईद सण एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाज पठण करून प्रशासनाला सहकार्य करावे व लॉक डाउनचे सर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाचा मुकाबला करण्यास आपले महत्त्वाचे योगदान द्यावे असे मत निफाडचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी यांनी व्यक्त केले. येथे पोलीस प्रशासनामार्फत बकरी ईदच्या पाशर््वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे,उपसरपंच जयदत्त होळकर, हारून शेख,नुरानी मशीद चे मौलाना मंजूर अहमद मिल्ली यांनी उपस्थितांना लॉकडाउनचे सर्व नियम पाळून बकरी ईदची नमाज घरीच पठण करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे,गुणवंत होळकर,माजी पंचायत समतिी सदस्य प्रकाश पाटील,राजू राणा,डॉ असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.यावेळी लासलगाव, टाकळी ,विंचूर,गोंदेगाव,रु ई,खडक माळेगाव,धारणगाव वीर,देवगाव,शिरवाडे वाकद,कानळद येथील मशिदीचे मौलाना,ट्रस्टी उपस्थित होते.
लासलगावी शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 2:32 PM