लासलगांव : येथील बाजार समितीत मंगळवारी लाल कांद्याला विक्रमी ११,१११ हजार रूपये भाव जाहीर झाला. सरासरी भावाची पातळी ७५०० रूपये होती. सोमवारच्या तुलनेत सकाळी ११०० रूपये कांदा भाव वाढ झाली. ८१५ वाहनातील ८३३० क्विंटल लाल कांदा किमान ३००१ ते कमाल ११,१११ व सरासरी ७५०० रूपये भावाने विक्र ी झाला. इतर राज्यांतील कांदा खराब झाल्याने महाराष्ट्रातील लाल कांद्याची मागणी वाढली असुन मागील सप्ताहाच्या तुलनेत एकाच दिवशी कांदा १२०० रूपयांची तेजी राहिली. सोमवारी १०१५ वाहनातील ११,१३० क्विंटल लाल कांदा किमान २००० ते कमाल १००९९, कमाल तर सरासरी भाव ८६०० रूपये प्रतिक्विंटल होते.गत सप्ताहात मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची ४६,६८९ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये २,००० कमाल रु पये ८,९०० तर सर्वसाधारण रु पये ६,०४१ रूपये प्रती क्विंटल राहिले.
लासलगांवी लाल कांदा ११ हजारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 1:18 PM