नाशिक, नगर, पुणे, औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच राजस्थान, बंगळुरू आणि गुजरात या ठिकाणी प्रामुख्याने स्थानिक टोमॅटोची मोठी आवक होत असते. टोमॅटो उत्पन्नाच्या तुलनेत देशांतर्गत मागणी नसल्याने तसेच गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरावर होताना दिसतो आहे. लासलगावसह पिंपळगाव बसवंत, वणी, चांदवड आणि येवला बाजार समितीत टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेट्सला ६० ते १०० रुपयांपर्यंत म्हणजे तीन ते पाच रुपये किलो इतका बाजार भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. वाहतूक, मार्केटमधील चढ-उतार, शेतातून तोडणीचा खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त टोमॅटोची निर्यात इतर राज्यांसह विदेशात कशी वाढवता येईल, यासाठी टोमॅटो निर्यातदार व्यापाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीकडे मागणी केली आहे. त्यानुसार लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार व नव्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदावर वर्णी लागलेल्या डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश यांसह आखाती देशात टोमॅटो कसा जास्त निर्यात करता येईल, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
इन्फो
एका क्रेटला शंभर रुपये दर
यावर्षी टोमॅटोच्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. लासलगावजवळील मरळगोई येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी योगेश फापाळे यांनी अर्धा एकर टोमॅटो पिकाची लागवड केली. ६० ते ७० हजार रुपये आतापर्यंत त्यांना खर्च झाला असून, टोमॅटोचे उत्पादन सुरू झाले आहे. लासलगाव बाजार समितीत त्यांनी सव्वाशे क्रेट्समधून टोमॅटो विक्रीसाठी आणले असता एका क्रेटला शंभर रुपये इतका बाजार भाव मिळाला आहे. उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाल्याचे टोमॅटो उत्पादक सांगतात.
फोटो- २३ टाेमॅटो
230821\23nsk_42_23082021_13.jpg
फोटो- २३ टोमॅटो