लासलगाव : लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करून सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात आले.जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजिवी जंतांपासून धोका आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा स्तरावर जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. तसेच या मोहिमेपासून वंचित राहिलेल्या मुलांना १६ आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. या दिनाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचालिका निता पाटील, शंतनू पाटील, कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
लासलगावी राष्ट्रीय जंतनाशक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:56 PM
लासलगाव : लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करून सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात आले.
ठळक मुद्दे२८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजिवी जंतांपासून धोका