लासलगाव : येथील बाजार समितीत लाल कांद्याच्या दरात शुक्र वारी गुरुवारच्या तुलनेत १६०० रुपयांची घसरण होत १५८९ वाहनांतील १३९५६ क्विंटल कांद्याला सकाळी किमान २००० ते कमाल ८००० व सरासरी ५६०० रुपये दर मिळाला. बुधवारी (दि. १८) ५५० वाहनांतील लाल कांदा ३००० ते १०७५१ रुपये, तर सरासरी ६६०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. गत सप्ताहातलाल कांद्याची ४६,६८९ क्विंटल आवक होती़
लासलगावी कांदा भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:25 AM