लासलगाव : येथील बाजार समितीत गुरूवारी कांद्याला हंगामातील सर्वोच्च भाव सात हजार रूपये क्ंिवंटल इतका मिळाला. दिनांक २१ नोव्हेंबर रोजी एक हजार रूपयांची तेजी होत सात हजार रूपये भाव जाहीर झाला तर सहाशे पन्नास रूपयांची तेजी होत लाल कांदा ५८५० रूपये भावाने विक्र ी झाला. सकाळी आज ३५ वाहनातील ४१३ क्विंटल उन्हाळ कांदा २६०० ते ७००० व सरासरी ६५४१ रूपये भावाने जाहीर झाला. सरासरी भावात ७०० रूपयांची तेजी होऊन लिलाव झाले.लाल कांदा आवक ५६० क्विंटल होती व लाल कांदा किमान २५८१ ते कमाल ५८५० व सरासरी ५५०० रूपये जाहीर झाले. बुधवारी ५७ वाहनातील ६२४ क्विंटल कांदा २००१ ते ६०९९ रूपये भावाने तर ५७५० रूपये तर ३१ वाहनातील ३८५ क्विंटल कांदा १६०० ते ५२२६ तर सरासरी ४५०० रूपये भावाने झाला. उन्हाळ कांदा १०० तर लाल कांदा ३२६ रूपयांनी तेजीत विक्र ी झाला. मंगळवारी दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सोमवारच्या तुलनेत उन्हाळ कांदा ३०० रूपयांची तेजी होऊन ५९१२ तर विंचुर उपआवारावर ६००० रूपये कमाल तर लाल कांदा ५० रूपयांची तेजी होऊन ४९०० रूपये सर्वाधिक भावाने विक्र ी झाला.
लासलगावी कांदा सात हजारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:36 PM
लासलगाव : येथील बाजार समितीत गुरूवारी कांद्याला हंगामातील सर्वोच्च भाव सात हजार रूपये क्ंिवंटल इतका मिळाला.
ठळक मुद्देहंगामातील विक्रमी भाव : हजार रूपयांची तेजी, शेतकऱ्यांमध्ये समाधान