लासलगाव : येथील बाजार समितीत शुक्रवारी लाल कांदा भावात ९०० रूपयांची तेजी होती. मागणीचा जोर कायम असल्याने सकाळी सत्रात ५५५ वाहनातील ५८०० क्विंटल लाल कांदा २००० ते ८९०० रूपये व सरासरी ७३०० रूपये भावाने लिलाव झाला. गुरूवारी ७७५ वाहनातील ८२१० क्विंटल लाल कांदा किमान २४०१ ते कमाल ८००१ व सरासरी ६६०१ रूपये भावानेविक्र ी झाला. बुधवारी मंगळवारच्या तुलनेत ३०० रूपये कमाल भावात घसरण झाल्याने कांदा उत्पादकांत तीव्र नाराजी असुन ७०० वाहनातील ७३२४ क्विंटल लाल कांदा किमान २१०१ ते कमाल ७५०० व सरासरी ६२०१ रूपये भावाने विक्र ी झाला होता.----------------------वणीत कांदा भावात घसरणवणीत गुरूवारच्या तुलनेत शुक्र वारी लाल कांद्याच्या दरात ५०० रु पयांची घसरण झाली. उपबाजारात ५२ वाहनामधुन ६०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. ८५३५ कमाल, ४४०३ किमान तर ६८८० रु पये प्रति क्विंटल सरासरी असा दर कांद्याला मिळाला. गुरूवारी ९००० रु पये प्रति क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला होता. त्यात आज ५०० रु पयांची घसरण झाली.कांदा खरेदी विक्र ीची व्यवहार प्रणाली सांभाळताना विविध अटी व निकष यांना व्यापारीवर्गाला सामोरे जावे लागते. याचे पालन करताना तारेवरची कसरत करावी लागते. साठवणुकीच्या मर्यादा साठा तपासणी व इतर बाबी या अडचणी निर्माण करणाऱ्या असल्याची भावना व्यापारी वर्गाची झाली आहे.
लासलगावी लाल कांदा दरात तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 2:29 PM