लासलगाव : हंगामात मंगळवारी प्रथमच लाल कांद्याची विक्रमी कांदा आवक झाली असून सतराशे वाहनातील १२२७० क्विंटल कांदा २१०० ते ८३०१ कमाल तर ६७०० रूपये सरासरी भावाने विक्र ी झाला. आवक वाढल्याने हजारो ट्रॅक्टर्स व वाहने वाढली तसेच वाहनचालकांना किमान तासभर तरी वाहतुक कोंडीचा फटका सहन करावा लागत आहे.लासलगावचे कांदा बाजारपेठेत मागील सप्ताहापासून आवक वाढली आहे. सोमवारी तर सकाळपासूनच कांदा घेऊन येणारी वाहने वाढली. सध्या बाराशेपेक्षा अधिक वाहनांमधून आवक होत आहे. परिणमी लासलगाव - चांदवड , लासलगाव - पिंपळगाव बसवंत व लासलगाव निफाड व लासलगाव पाटोदा या रस्त्यावर असलेली वाहने दिवस रांगा लावावी लागते. या वाहतूक कोंडीत सापडलेल्या बसमधील प्रवाशांचे मात्र आतोनात हाल होत आहे.नाशिक जिल्ह्यात लासलगाव बाजार समितीत कांद्याला चांगले भाव मिळतात.त्यामुळे सोमवारी सर्वाधिक आवक झाली. शेतकरी बांधवांनी आपले वाहने शिस्तीने रस्त्यावर उभी करावी. वाहतुक नियम तोडु नये व वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन सभापती सुवर्णा जगताप यांनी केले. कांदा शेतावर सुकवुन आणला तर पिकाला भाव चांगले जाहीर होतात.त्यामुळे घाईने कांदा न आणता सुकवुन आणला तर भाव चांगले मिळण्याची अधिक शक्यता असल्याचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.
लासलगावी लाल कांद्याची विक्रमी आवक, वाहतुक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 2:48 PM