लासलगांव : येथील बाजार समितीत शुक्रवारी उन्हाळ कांद्याला ५६०० रूपये भाव मिळाला. ९५ वाहनातील ११६४ क्विंटल कांदा २५९० ते ५६०० रूपये भाव मिळाला. लाल कांदा किमान १५०० ते कमाल ४२९० ते सरासरी २८३० रूपये भावाने विक्र ी झाला. कांद्याचे भाव क्विंटलला सहा हजार रु पयांपर्यंत पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने एक लाख टन कांदा आयात करीत आहे. आयातीची एमएमटीसी या सरकारी कंपनीवर जबाबदारी सोपवली आहे. १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात देशातील जनतेला एक लाख टन आयात कांद्याचे वितरण करण्याची जबाबदारी नाफेडवर सोपवल्याचे सरकारने जाहीर केले आणि दुसऱ्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडले. मागील तीन महिन्यांपासून कांद्याच्या किमती वाढल्यापासून सरकारने आॅगस्टच्या अखेरीस कांद्याचे किमान निर्यातमूल्य वाढवून ते टनाला ८५० डॉलर केले. नंतर कांद्याची निर्यात बंद करून दोन हजार टन कांदा आयातीची निविदा काढली. त्याचबरोबर सरकारने कांदा साठवण्याबाबतही व्यापाºयांवर निर्बंध घातले. नाशिक जिल्ह्यात कांदा हे नगदी पीक असून ते दुष्काळी भागातील शेतकºयांसाठी अर्थकारण पूर्णत: अवलंबून आहे. आता नाफेडच्या माध्यमातून आयात कांदा वितरण करणार असल्याचे बोलत आहे. मात्र, गेले तीन मिहन्यांपासूनच सरकारने देशातील शेतकºयांकडून कांदा खरेदी करून तो नाफेडमार्फत ग्राहकांना वितरीत केला असता तर देशातील शेतकºयांचे व ग्राहकांचेही साधले गेले असते, असे शेतकºयांमध्ये बोलले जात आहे.
लासलगावी उन्हाळ कांद्याला ५६०० रूपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 3:43 PM