शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

लासलगावी उन्हाळ कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 12:00 AM

लासलगाव येथील बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव मंगळवारी (दि.७) पूर्ववत सुरू झाले, परंतु लाल व उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. मुख्य बाजार आवारात ५७२ वाहनातील २६ हजार ८६५ बारदान गोणीतील लाल कांदा लिलाव ४०० ते ९०० व सरासरी ८०० रुपये तर उन्हाळ कांदा ५०० ते १३७१ रूपये व सरासरी १२०० रूपये प्रतिक्विंटल भावाने झाला. विंचूर येथे ५५१ तर निफाड येथील उपआवारावर २०८ वाहनातील कांदा आवक झाली.

ठळक मुद्देशेतकरीवर्ग चिंतेत : बाजार समितीत आठ दिवसांनंतर व्यवहार सुरू

लासलगाव : येथील बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव मंगळवारी (दि.७) पूर्ववत सुरू झाले, परंतु लाल व उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. मुख्य बाजार आवारात ५७२ वाहनातील २६ हजार ८६५ बारदान गोणीतील लाल कांदा लिलाव ४०० ते ९०० व सरासरी ८०० रुपये तर उन्हाळ कांदा ५०० ते १३७१ रूपये व सरासरी १२०० रूपये प्रतिक्विंटल भावाने झाला. विंचूर येथे ५५१ तर निफाड येथील उपआवारावर २०८ वाहनातील कांदा आवक झाली.आठ दिवसानंतर सुरू झालेल्या कांद्याचे लिलाव बघता पूर्वीच्या तुलनेत कांद्यास बºयापैकी बाजारभाव मिळतील ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आशा फोल ठरली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापाºयांकडे मजूर नसल्याने शेतकºयांना कांदा गोणी, बारदानामध्ये भरून आणावा लागत आहे. यामुळे शेतकºयांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यातच कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतित आहे. आठ दिवसांपूर्वी अर्थातच ३० मार्चला येथे लाल कांद्यास प्रतिक्विंटल मिळालेले कांदा बाजारभाव बघता या सप्ताहात लाल कांदा किमान बाजारभावात ३०० रुपये, कमाल बाजारभावात ५०० तर सरासरी बाजारभावात १०१ रु पयांनी घसरण झाल्याचे यावेळी दिसूनआले.नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार आवारावर कांदा लिलाव खुल्या पद्धतीने करण्याचे आदेश नाशिकचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिलेले असले तरी नाशिक जिल्ह्यात बहुसंख्य बाजार आवारावर कांदा लिलाव गोणी पद्धतीने झाल्याने थेट व्यापारी वर्गानी सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला जुमानले नसल्याचे दिसून आले. कांदा गोणीचा खर्च येत असल्याने कांदा उत्पादकांचे नुकसान टाळता यावे याकरिता कांदा लिलाव बारदान गोणीत न होता खुल्या पद्धतीने होणार असून देशभरात कांदा व शेतमालाची पाठवणी व्हावी यासाठी शासकीय अधिकारी गतिमान झाले आहेत, परंतु काही आवारावर गोणी पद्धतीने लिलाव झाले. काही बाजार आवारात दि.७ तर काही आवारात ९ एप्रिलपासून खुल्या पद्धतीने लिलाव होणार आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद होते. मंगळवारपासून हे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. कांदा हा जीवनावश्यक वस्तू असल्याने कांद्याचा पुरवठा सुरू राहावा, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे आता लिलाव सुरू राहणार आहेत.- सुवर्णा जगताप, सभापती, बाजार समिती, लासलगाव

सध्या मिळत असलेल्या भावामुळे उत्पादन खर्चदेखील सुटत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. निर्यातबंदी जरी उठवली तरी अनेक देशांमध्ये कांद्याची निर्यात बंद आहे. यामुळे आवक वाढली तर मागणी घटली आहे. कांद्याला भाव मिळत नाही. पंधराशेच्या पुढे दर मिळाला पाहिजे.- राजाबाबा होळकर, कांदा उत्पादक शेतकरी.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड