मक्याच्या कणसाला लागलेली लष्कर अळीची कीड.नाशिकरोड : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात मका पिकावर ‘लष्कर अळी कीड’चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करून शासनाकडून औषधे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मका उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील दारणा, वालदेवी व गोदावरी नदी भागातील वंजारवाडी, लहवित, भगूर, लोहशिंगवे, नाणेगाव, राहुरी, दोनवाडे, शिंदे, पळसे, शेवगेदारणा, संसरी, बेलतगव्हाण, चेहेडी, सामनगाव, कोटमगाव, गंगापाडळी, लाखलगाव, जाखोरी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मका पिकांचे उत्पादन घेतले जाते. मार्च महिन्यापासून मक्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या एक-दीड महिन्यापूर्वी लागवड केलेल्या मक्याची पाने कुरतडून ‘लष्कर अळी कीड’चा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अत्यंत झपाट्याने पसरणाºया या कीडचा प्रादुर्भाव जवळपास नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांश मका पिकांवर झाला आहे. मक्याच्या कणसांमध्ये लष्कर अळी कीडची लागण झाल्याने कोंब व कणसावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. यामुळे मका पिकाचा शेंडा व कणसावर विपरीत परिणाम होत आहे. मका पिकांतून मिळणाºया उत्पन्नाच्या दृष्टीने महागडी औषधे वापरणे शेतकºयाला परवडत नसल्याने मका उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहेत.मका पिकावर लष्कर अळी किडीची लागण झाल्याने त्यांचा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. यामुळे मका महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुक्कुटपालनात व जनावरांना खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मका वापरला जातो. तसेच वैरण म्हणून जनावरांना दिला जाणारा कडबा याच्यातदेखील घट होणार असल्याने भविष्यात त्यांची टंचाई निर्माण होऊ शकते. नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात मका पिकांवर झालेली लष्कर अळी कीडची कृषी अधिकाºयांनी पाहणी करून शासनास अहवाल पाठविण्याची गरज निर्माण झाली आहे. कीडमुळे मका पिकाच्या होत असलेल्या नुकसानीमुळे मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मक्यावर ‘लष्कर’ अळीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:25 PM
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात मका पिकावर ‘लष्कर अळी कीड’चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करून शासनाकडून औषधे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मका उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : तालुक्याच्या पूर्व भागात प्रादुर्भाव; किडीचा वेगाने फैलाव