लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : टमाट्याच्या भावात वाढ सुरूच आहे. घाऊक बाजारात नेहमीच्या तुलनेत टमाट्याच्या भावात चौपटीने वाढ झाली आहे. लासलगाव येथील कृषी उतपन्न बाजार समितीत टमाटा प्रतिक्रेट ८०० ते १००० रुपयापर्यंत पोहोचला आहे. रविवारी आठवडे बाजारात टमाट्याची तब्बल ६० ते ८० रु पये किलो या भावाने विक्री झाली. त्यामुळे टमाटा, नको रे बाबा! असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. किरकोळ बाजारात २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या टमाट्याचे भाव आता ६० ते ८० रु पयांवर पोहोचले असून, स्वयंपाकघरातून टमाटा गायब होत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ४० ते ५० रु पये घाऊक भाव असला, तरी किरकोळ विक्र ेते दुप्पट रकमेने विक्र ी करीत आहेत. बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक मागणीपेक्षा अगदी कमी असल्याने दर वाढलेले आहेत. टमाटा हा सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे टमाट्याला जास्त मागणी असते. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने भाव कडाडले आहेत. दोन महिन्यांपूर्वी २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या टमाट्याचे भाव आता ६० ते ८० रु पयांवर पोहोचले असून, वीस किलोच्या क्रेटला कृषी उत्पन्न बाजार समितीत ८०० ते १००० रु पयांचा दर मिळत आहे. सध्या बाजार समितीमध्ये दररोज ५० ते १०० क्रेट आवक होत आहे. त्या मुळे भावात वाढ होत आहे यंदा चांगला पाऊस झाल्याने १५ आॅगस्टपासून मोठी आवाक होण्याची शक्यचा वर्तविली जात आहे. सध्या उन्हाळ्यात ज्यां शेतकऱ्यांकडे पाणी होते त्यांचे टमाटे बाजारात विक्रीला येत आहेत. आवकच्या तुलनेत मागणी जास्त आहे. परिणामी भाव कडाडले आहेत. पुढील १५ दिवस अशीच स्थिती राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. नेहमीच्या तुलनेत आवक निम्म्याने घटली आहे.देवळ्यात कांद्याने ओलांडला हजाराचा टप्पालोहोणेर : देवळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याने प्रतिक्विंटल एक हजार रुपये भावाचा टप्पा पार केला असून, आज सर्वाधिक एक हजार एक रु पये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. यामुळे कांद्याबाबत शेतकरी वर्गाच्या आशा वाढल्या आहेत. गेल्या वर्षभर कांद्याचा भाव ५०० ते ७०० रु पयांदरम्यान व त्याच्या आतच घुटमळत राहिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी होती. सोमवारी कांद्याच्या भावात बऱ्यापैकी वाढ झाली. देवळा येथील बाजार समितीत सोमवारी २५९ ट्रॅक्टर, ११४ पिकअप व पाच बैलगाड्यांमधून कांद्याची आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ४५१ रु ., तर कमाल १००१ रु . असा भाव मिळाला. सरासरी ९०० रु . भाव होता. या भाववाढीमुळे शेतकरी सुखावला असला, तरी कांदा उत्पादन खर्च वसूल होण्यासाठी किमान १५०० रु . एवढा भाव मिळाला पाहिजे, असे मत यावेळी काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले. आगामी दिवसात कांद्याचे भाव अजून वाढतील असा अंदाज काही कांदा उत्पादक जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी आपला कांदा देवळा बाजार समितीत विक्र ीसाठी आणताना प्रतवारी करून आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अशोक आहेर व सचिव दौलतराव शिंदे यांनी केले आहे.
लासलगावी टमाटे ८० रु. किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 1:16 AM