लासलगांव : येथील बाजार समितीत गुरूवारी १८३९ वाहनांतून ४०,९७६ क्विंटल कांद्याची हंगामातीलविक्रमी आवक झाली, परंतु कमाल भावात नव्वद रूपयांची घसरण झाल्याने उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली. गुरूवारी लाल कांदा किमान भाव २५० ते कमाल भाव ५८९ रूपये तर सरासरी भाव ४०० रूपये होता. तर सोमवारी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी लाल कांदा आवक ३५,६४० क्विंटल, १,६१७ नग होती तर भाव किमान भाव २५० ते कमाल ६८० व सरासरी ४३० रूपये होता. गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची १,५६,४६५ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये २५१ कमाल रु पये ६७० तर सर्वसाधारण रु पये ४२८ प्रती क्विंटल राहिले. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नगदी पीक असल्याने कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असतात. जिल्ह्यातील बरेच साखर कारखाना बंद पडल्याने ऊस उत्पादक शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळल्याने चार वर्षांमध्ये कांदा लागवडीमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याचाच परिणाम हा कांदा दर घसरला आहे. २०१३ मध्ये एक लाख २४ हजार हेक्टर कांदा लागवड जिल्ह्यातून झाली होती.तिच २०१७-१८ मध्ये दोन लाख २७ हजार हेक्टर इतकी झाली आहे. जिल्ह्यामध्ये कांदा लागवडीचे क्षेत्र जवळपास ८० टक्क्यांनी वाढल्याने कांद्याचे बंपर उत्पादन झाले आहे.
लासलगावी कांद्याची विक्रमी आवक, भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:46 PM