नाशिक : वाहनचालकांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याची मानसिकता ही अपघातांना कारणीभूत असून, शहर पोलीस आयुक्तालयाने बेशिस्त वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे़ गत दहा महिन्यांच्या कालावधित शहर वाहतूक शाखेने राबविलेल्या विशेष मोहिमेत १ लाख ७० हजार ६५० बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून त्यांच्याकडून ३ कोटी ८७ लाख ५४ हजार ५०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे़
वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे केले जाणारे सर्रास उल्लंघन हे अपघाताचे प्रमुख कारण आहे़ त्यांच्या बेदरकारमुळे निष्पाप नागरिकांचा जीव जात असून, नियमितपणे कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे़ पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी दुचाकी वाहनावर हेल्मेट, चारचाकीमध्ये सीट बेल्ट अनिवार्य केला़ तसेच विविध उपक्रमांची सुरुवात पोलिसांपासून केली़ याबरोबरच शाळा, महाविद्यालये या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्यामध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली़
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील तेराही पोलीस ठाण्यांमधील जानेवारी २०१८ ते आॅक्टोबर २०१८ या कालावधित पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे़
निष्पाप लोकांचे प्राण वाचतील़बेशिस्त वाहनचालक नियमांचे उल्लंघन करीत असल्याने अपघात वाढत असून, यामध्ये निष्पाप नागरिकांचा जीव जातोय़ अपघाताची संख्या व त्यामधील मृत्यू कमी करणे तसेच वाहतूक सुरळीत व सुव्यवस्थित व्हावी यासाठी पोलीस सतत प्रयत्नश्ील असतात़ हेल्मेटसक्ती, सीटबेल्ट याची सुरुवातही सर्वप्रथम पोलीसांपासून केली होती़ तसेच शाळा व महाविद्यालयांमध्येही वाहतूक नियमांबाबत जनजागृतीही केली़ वाहनचालकांवर कारवाई करून महसूल जमा करण्याचा मुळीच उद्देश नाही़ याद्वारे वाहनचालकांना शिस्त लागली तर अनेक निष्पाप लोकांचे प्राण वाचतील़- डॉ़रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक