नाशिकरोड : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत बुधवारी टीडीएफ व शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, टीडीएफचे दुसरे उमेदवार संदीप बेडसे यांच्यासह आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आजपर्यंत १३ जणांनी २० उमेदवारी अर्ज दाखल केले असून, गुरुवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. निवडणुकीत चार-पाच उमेदवारांनी आपणच टीडीएफचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत अर्ज दाखल केले आहेत. यामुळे संघटनेतील राजकारण उफाळून आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांच्याकडे बुधवारी टीडीएफ व शिवसेना पुरस्कृत किशोर भिकाजी दराडे, टीडीएफचे दुसरे उमेदवार संदीप बेडसे, सुनील धोंडू फरस, शालिग्राम भिरूड, बाबासाहेब गांगुर्डे, अमृत शिंदे, गजानन खराटे, बहुजन शिक्षक लोकशाही आघाडीचे रवींद्र भिवाजी पटेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:14 AM
नाशिकरोड : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत बुधवारी टीडीएफ व शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, टीडीएफचे दुसरे उमेदवार संदीप बेडसे यांच्यासह आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आजपर्यंत १३ जणांनी २० उमेदवारी अर्ज दाखल केले असून, गुरुवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
ठळक मुद्दे शिक्षक मतदारसंघ निवडणूक