नाशिक : सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. १९) अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक, तर कार्यकारिणी मंडळ सदस्यपदासाठी अर्ज केलेल्या तब्बल ३६ उमेदवारांनी माघार घेतल्याने या निवडणुकीत बहुरंगी लढतीचा सामना बघायला मिळणार आहे.अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी शनिवारी रात्री उशिरा ग्रंथमित्र पॅनलची घोषणा झाल्याने अध्यपदाच्या रिंगणात असलेल्या मधुकर झेंडे यांच्या अर्ज माघारीची केवळ औपचारिकता बाकी होती. रविवारी (दि. १९) अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मधुकर झेंडे (अध्यक्ष) तर आकाश पगार (उपाध्यक्ष) यांच्यासह कार्यकारिणी मंडळातील ३६ सदस्यांनी आपले अर्ज माघारी घेतले. या निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या एकूण ८९ अर्जांपैकी विविध पदांवरील ४१ उमेदवारांनी माघार घेतली आहे.कार्यकारिणी सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या प्रमोद हिंगमिरे, सावळीराम तिदमे, सुरेश राका, नानासाहेब बोरस्ते, हेमंत पाठक, श्रीकृष्ण शिरोडे, लक्ष्मीकांत भट, प्रवीण मारू, शारदा गायकवाड, कांतीलाल कोठारी, सुभाष सबनीस, शरद पुराणिक, अमोल बर्वे, चंद्रहास वर्टी, चंद्रकांत गुजराथी, सुनील कुटे तसेचशेवटच्या क्षणापर्यंत अर्ज माघारीसाठी गर्दीरविवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने वाचनालयात सकाळपासूच उमेदवारांची गर्दी बघायला मिळाली. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत पॅनल बनविण्यासाठी अनेक उमेदवारांकडून व्यूहरचना आखली जात होती. या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २०) वैध उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार असून, मंगळवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. १७५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष आणि १५ कार्यकारी मंडळ सदस्य अशा १८ जागांसाठी हे मतदान होणार असून ग्रंथमित्र पॅनल आणि जनस्थान पॅनल या दोन पॅनलसह निवडणुकीतील उर्वरित उमेदवारांच्या भूमिकेमुळे या निवडणुकीत रंगत येणार आहे.
अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चाळीस उमेदवारांची माघार
By admin | Published: March 20, 2017 12:33 AM