मेशी : देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील मेशीसह परिसरातील कोरडवाहू खरिपाच्या पिकांना घरघर लागली आहे. गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारली असल्याने यावर्षी भयानक दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.सध्या कडक ऊन पडत आहे. आता सगळ्यांचाच धीर सुटला आहे. बाजरी, मका, भुईमूग यांचा अक्षरश: चारा झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी विहिरीचे पाणी दिले आहे ती पिकेबरी आहेत. या भागातील तीनही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे; मात्र पाण्याअभावी कांदा लागवड लांबणीवर पडली आहे. काहींनी कोरड्यात लागवड केली आहे, ती मात्र वाया जाण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. विहिरींची पाणी पातळी कमी होत आहे. नाले, ओढे कोरडे आहेत. चाराटंचाई निर्माण झाली आहे.पोळा सण कोरडा साजरा झाला. त्यामुळे आता केवळ गणेशोत्सवात शेतकरी आशाधरून आहेत. एवढे मात्र नक्की की खरीप वाया गेलाच, परंतुपरतीचा पाऊस झाला तर किमान रब्बी हंगाम तरी येईल अशी आशा आहे. पाणीटंचाई आतापासूनच आ वासून उभी राहिली आहे.
कोरडवाहू खरीप पिके मोजू लागली अखेरची घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:42 AM
देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील मेशीसह परिसरातील कोरडवाहू खरिपाच्या पिकांना घरघर लागली आहे. गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारली असल्याने यावर्षी भयानक दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देकांदा लागवड लांबणीवर विहिरींनी गाठला तळ; पाऊस न पडल्यास रब्बीही धोक्यात