लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत येत्या दि. २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असतानाच तत्पूर्वी पुढच्या आठवड्यात स्थायी समिती व सर्वसाधारण सभा घेण्याचे पदाधिकारी, प्रशासनाने निश्चित केले असून, या सभांच्या माध्यमातून आगामी काळातील विकास कामांच्या मंजुरीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व पदाधिका-यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या असून, येत्या दि. २० डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी, विषय समित्यांचे सभापतींची वाढविलेली मुदत संपुष्टात येत आहे. या मुदतीनंतर नवीन अध्यक्ष व पदाधिकाºयांची निवडणूक घेण्यात यावी, असे आदेश आहेत. त्यामुळे तत्पूर्वी पदाधिकारी, सदस्यांच्या गटातील महत्त्वाची कामे मार्गी लागण्याबरोबरच प्रशासनाला काही महत्त्वाच्या कामांसाठी मंजुरी हव्या असल्या तरी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व प्रशासनातील बेबनावामुळे ५ डिसेंबर रोजी आयोजित केलेली स्थायी समितीची सभा होवू शकली नव्हती. अखर्चित निधी व विकास कामे होत नसल्याच्या कारणावरून सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे ही सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी तहकूब केली होती. त्यामुळे तहकूब सभा सात ते दहा दिवसांत घेणे बंधनकारक असताना प्रशासनाने येत्या दि. १७ डिसेंबर रोजी स्थायी समितीची सभा घेण्याचे निश्चित केले आहे. स्थायी समितीच्या सभेचा अजेंडा सदस्यांना पाठविण्यात आला आहे. दुसरीकडे विद्यमान पदाधिकाºयांचा कार्यकाळ पुढच्या आठवड्यात संपुष्टात येत असल्याने या पदाधिकाºयांना गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सहकार्य करणारे सदस्य, प्रशासनातील अधिकाºयांनी केलेली मदत पाहता अशा सर्वांचे आभार मानण्याबरोबरच आर्थिक वर्षाअखेर सर्व निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पदाधिकाºयांची मुदत ज्या दिवशी म्हणजे दि. २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे, त्याच दिवशीअखेरची सभा घेण्याचे ठरले आहे.