शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

अखेर भालेकर मैदानावरच गणेश मंडळांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:07 AM

महापालिकेच्या वतीने अखेरीस भालेकर मैदानावर गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली असून, संबंधित मंडळांना फेरअर्ज करण्याच्या सूचना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केल्या आहेत.

नाशिक : महापालिकेच्या वतीने अखेरीस भालेकर मैदानावर गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली असून, संबंधित मंडळांना फेरअर्ज करण्याच्या सूचना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केल्या आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आयुक्तांशी चर्चा करून परवानगीबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतरही आयुक्तांनी विचार करून ठरवू, असे सांगितल्याचे गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केल्याने पुन्हा गोंधळ निर्माण झाला आणि अखेरीस तो मिटला.  मनपाच्या वतीने दरवर्षी भालेकर मैदानावर उत्सवासाठी परवानगी दिली जाते. परंतु यंदा ई-पार्किंगचे काम या मैदानावर सुरू असल्याने महापालिकेने परवानगी नाकारली होती. त्यामुळे आठ मंडळांना उत्सव कुठे साजरा करावा असा प्रश्न पडला होता. आयुक्तांनी ईदगाह मैदानाची पर्यायी जागा दिली असली तरी पोलीस खात्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नकार दिला होता. रविवारी (दि. २) पालकमंत्र्यांनी आयुक्त मुंढे यांना भालेकर मैदानावरच परवानगी द्या, असे आदेश दिले होते.  परंतु आयुक्त मुंढे यांची भेट घेतली तेव्हा गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाºयांना त्यांनी विचार करू, असे सांगितल्याने पालकमंत्र्यांचे आदेश आयुक्त जुमानत नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती