शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

खामखेड्यात कांदा लागवड अंतिम टप्प्यात

By admin | Published: December 21, 2016 11:44 PM

मजुरांना सुगीचे दिवस : शेतकऱ्यांची धावपळ सुरू

खामखेडा : परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र मध्यंतरीच्या पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने यावर्षी कांद्याची लागवड उशिराने केली जात आहे.उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. साधारणत: आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाळी कांदा लागवडीला सुरुवात केली जाते. ती नोव्हेंबर ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होते. कारण पुढे उन्हाच्या कडाक्यामुळे विहिरीचे पाणी कमी-कमी होत जाते. परंतु यावर्षी मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे सुरुवातीच्या काळात टाकलेली उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा कांद्याची बियाणे टाकून रोपे तयार करावी लागल्याने यावर्षी परिसरात कांद्याची लागवड उशिराने केली जात आहे.  पूर्वी बागयती शेती अल्प प्रमाणात असल्याने शेतीच्या कामासाठी अगदी सहजतेने मजूर वर्ग उपलब्ध होत असे. परंतु विज्ञान युगात शेतीचा विकास झाल्याने पूर्वी काम करणारा मजूर शेतकरी झाल्याने आता गावात मजुरांची टंचाई भासू लागली आहे. सध्या रब्बीचा हंगाम असल्याने मजूर मिळणेही मुश्कील झाले आहे.  मजूर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वनवन करीत भटकावे लागत आहे. तेव्हा बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मजूर आणण्यासाठी व परत सोडण्यासाठी स्वत:ची वाहन व्यवस्था आहे ते बाहेरगावाहून मजूर आणतात. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे वाहन व्यवस्था नाही खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यात पैशाही खर्च होत आहे. रिक्षावाला बाहेरगावी जाऊन मजुरांना शेतात सोडतो व सायंकाळी ५ वाजता त्यांच्या गावी सोडतो. सध्या मजुरांना सुगीचे दिवस आले असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)