नाशिक : यंदा दिवाळी आणि नाताळ या सणांच्या पार्श्वभूमीवर आॅक्टोबर, नोव्हेबर आणि डिसेंबर महिन्यांत तब्बल २५ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जे ग्राहक आॅनलाइन आर्थिक व्यवहार करणार नाहीत, त्यांच्यासाठी या सुट्या डोकेदुखी ठरणार असून, बँकांना असलेल्या सुट्यांचे नियोजन पाहून आर्थिक व्यवहार करणे उपयुक्त ठरणार आहे. नोटाबंदीनंतर देशात आॅनलाइन आर्थिक व्यवहाराला बºयापैकी गती मिळाली होती. मात्र, चलन तुटवड्याची स्थिती संपताच पुन्हा रोखीने व्यवहार करण्याला नागरिकांनी पसंती दिली असून, आता या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये तब्बल २५ दिवस बँका बंद राहणार असल्याने बाजारात चलन टंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच रविवार, दि.१ आॅक्टोबरला लागून २ आॅक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती असल्याने बँका दोन दिवस बंद राहिल्या, तर १४ आॅक्टोबरला दुसरा शनिवार आणि रविवारी बँका बंद होत्या. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर १९ आॅक्टोबरला (लक्ष्मीपूजन) आणि २० आॅक्टोबर (पाडवा) अशा सलग दोन दिवस बँका बंद राहिल्या असून, लक्ष्मीपूजन, पाडव्याची सुटी झाल्यानंतर शनिवारी बँका उघडल्या, मात्र पुन्हा २२ आॅक्टोबरला रविवारची सुटी आली, तर २८ आॅक्टोबरला चौथा शनिवार आणि २९ आॅक्टोबरला रविवार असे दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात गुरु नानक जयंतीनिमित्त ४ नोव्हेंबर रोजीही बँकांना सुटी असून ५, १२, १९ आणि २६ नोव्हेंबरला रविवारची साप्ताहिक सुटी व ११ आणि २५ नोव्हेंबरला महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवारच्या दिवशी सुट्यांमुळे बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. डिसेंबर महिन्यात २३, २४ आणि २५ रोजी चौथा शनिवार, रविवार आणि नाताळच्या सलग तीन सुट्या आल्या आहेत, तर ३, १०, १७ आणि ३१ डिसेंबरला रविवारच्या साप्ताहिक सुटीमुळे बँकांचे काम बंद राहणार असून, दुसºया आणि चौथ्या शनिवारी ९ आणि २३ डिसेंबरलाही बँका बंद राहतील. याशिवाय ईद-ए-मिलादच्या निमित्ताने १ डिसेंबरलाही बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे या तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २५ दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांना आॅनलाइन अथवा कॅशलेस व्यवहार करणे शक्य नाही. त्यांना या सुट्यांच्या नियोजनानुसारच आपले आर्थिक गणितं जुळवावी लागणार आहेत.
अखेरच्या तीन महिन्यांत बँकांना २५ सुट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:25 AM