नाशिक : ‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठीलाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती...’ असे लिहून ठेवणाऱ्या कविवर्य मंगेश पाडगावकर व नाशिककरांचा अतूट स्नेह होता. पाडगावकर हे कुसुमाग्रजांना पितृस्थानी मानत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या मानाच्या ‘जनस्थान’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. पाडगावकर, वसंत बापट व विंदा करंदीकर या त्रयीने नाशिकमध्ये अनेक मैफली रंगवल्या. पाडगावकरांच्या या काव्यमैफलींच्या तरल आठवणी नाशिककरांच्या मनामनांत अजूनही ताज्या आहेत.
अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी...
By admin | Published: December 31, 2015 12:13 AM