नाशिक : कळसूबाई व हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात राज्यप्राणी शेकरूंची संख्या गेल्या वर्षापासून वाढत आहे. नाशिक वन्यजीव विभागाकडून या क्षेत्राच्या परिसरात गठित करण्यात आलेल्या ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांचे हे फलित असल्याचे मानले जात आहे. पंधरवड्यानंतर अभयारण्य क्षेत्रात ‘शेकरू’ची गणना शास्त्रोक्त पध्दतीने सुरू होणार आहे. नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमधील वृक्षसंपदा असलेल्या देवरायांमध्ये शेकरूची चांगली जोपासणा होत आहे. यामध्ये प्रामुख्याने भंडारदराजवळील घाटघर, कोलटेंभे, रतनवाडी, कुमशेत, साम्रद भागासह राजूर वनपरिक्षेत्रातील कोठुळे, टोलारखिंड आदी परिसरातील दाट व उंचीवरील वृक्षसंपदेवर शेकरूचा अधिवास असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे व अमोल आडे यांनी सांगितले. मागील वर्षी झालेल्या गणनेमध्ये शेकरूंची संख्या समाधानकारक असल्याचे दिसून आले होते. महाबळेश्वर परिसरातील नैसर्गिक जैवविविधता व वृक्षसंपदेशी साम्य असलेल्या अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्राचा परिसर शेकरूंसाठी पोषक व सुरक्षित नैसर्गिक अधिवास असल्याचे सहायक वनसंरक्षक शिवाजी ठाकरे यांनी सांगितले. या भागातील आदिवासी लोकसंस्कृती आणि निसर्गाच्या प्रेमामुळे शेकरूसह अन्य वन्यजीवांचे संवर्धन होण्यास हातभार लागत आहे. येत्या १५ तारखेनंतर अभयारण्य क्षेत्रात शेक रूंची वार्षिक प्रगणना करण्यात येणार आहे. यासाठी नाशिक वन्यजीव विभागाची तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी शेकरूंची शिरगणना व घरट्यांच्या गणनेवरून शेकरूंचा अंदाज वन्यजीव विभागाने बांधला होता. गेल्यावर्षी भंडारदरा परिक्षेत्रात ४३ घरटी आढळून आली होती त्यावरून १७ शेकरूंचा अधिवास असण्याची शक्यता वर्तविली गेली दरम्यान, सहा शेकरू प्रत्यक्षरीत्या वनकर्मचाºयांना नजरेस पडले होते. तसेच राजूर परिक्षेत्रात १४० शेक रूंचा अधिवास असल्याचा अंदाज त्यांच्या घरट्यांच्या संख्येवरून लावण्यात आला होता. एक शेकरू तीन घरट्यांचा वापर करतो.अभयारण्य क्षेत्रात २४ गावेकळसूबाईला नाशिक, अहमदनगर, ठाणे या जिल्ह्णांच्या सीमा आहेत. तसेच हरिश्चंद्रगडाला पुणे, नगर, ठाणे या जिल्ह्णांच्या सीमा आहेत. नाशिकची सीमा कळसूबाई शिखरापासून जवळ आहे. या अभयारण्य क्षेत्राची विभागणी भंडारदरा व राजूर या वनपरिक्षेत्रांच्या हद्दीत करण्यात आली आहे. भंडारदरा परिक्षेत्रातील दहा व राजूरमधील १४ गावांचा यामध्ये समावेश होतो. अभयारण्याचे एकूण क्षेत्र २९ हजार इतके आहे. ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे गठन या अभयारण्य क्षेत्रातील २४ गावांमध्ये करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी समाधानकारक संख्या : वन्यजीव विभागाकडून यंदाची वार्षिक गणना लवकरच कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वाढतोय ‘शेकरू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:16 AM
नाशिक : कळसूबाई व हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात राज्यप्राणी शेकरूंची संख्या गेल्या वर्षापासून वाढत आहे. नाशिक वन्यजीव विभागाकडून या क्षेत्राच्या परिसरात गठित करण्यात आलेल्या ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांचे हे फलित असल्याचे मानले जात आहे.
ठळक मुद्देदेवरायांमध्ये शेकरूची चांगली जोपासणा गणनेमध्ये शेकरूंची संख्या समाधानकारक