माजी सरपंच नवनाथ घुगे, शरद कुटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसिद्धेश्वर पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. ९ जागांसाठी सरळ लढत झाली. त्यात जयंत आव्हाड यांच्यासह सहकाऱ्यांच्या पॅनलने काठावर पास होत, सत्ता काबीज केली आहे.
शिवसिद्धेश्वर परिवर्तन पॅनलमध्ये प्रवीण उगले (२५१), संगीता नाना आव्हाड (२३८), नवनाथ प्रकाश घुगे (१९८), वसंत महादू आव्हाड (१७४) या ४ उमेदवारांना मतदारांनी संधी दिली, तर अविनाश आव्हाड (१३३), गायत्री लालचंद आव्हाड (१५०), कांता रघुनाथ भगत (१५१), इंदुबाई शिवाजी आव्हाड (२१०), वनिता शरद हांडे (१३५) यांना साफ नाकारले.
दरम्यान, विजयानंतर स्व.गोपीनाथराव मुंडे पॅनलच्या विजयी उमेदवारांसह नेते, कार्यकर्ते यांनी आनंदोत्सव साजरा केला.
इन्फो...
विजयी उमेदवारांना मिळालेली मते
स्व.गोपीनाथराव मुंडे पॅनलचे भाऊलाल घुगे (२३७), स्नेहल शरद आव्हाड (२१८), मनीषा प्रवीण भालेराव (२१६), मंदाबाई प्रकाश आव्हाड (२३३), मीराबाई अशोक पवार (१८६) यांच्या भाळी विजयाचा गुलाल लागला, तर सुमन कोंडाजी आव्हाड (१९८), नंदा रामदास घुगे (१२९), वैशाली ज्ञानेश्वर आव्हाड (१५२), शोभा नवनाथ आव्हाड (२०९) यांना पराभवाचा सामना करावा लागला.
फोटो ओळ- पास्ते ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना स्व.मुंडे पॅनलचे नेते व कार्यकर्ते.