सटाणा : येथील पालिकेच्या महात्मा गांधी वाचनालयात दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पि. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करून आजचा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी सनपाच्या उपनगराध्यक्ष भारती सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना प्रशासकीय अधिकारी विजय देवरे म्हणाले प्रत्येकाने वाचन केले पाहीजे. वाचनाने फक्त ज्ञान मिळत नाही तर भाषा देखिल समृद्ध होत असते. आजच्या युगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. मोबाईलच्या माध्यमातून ही पुस्तके उपलब्ध झाली आहेत, त्याचा उपयोग पालकांनी मुलांना चनाची आवड निर्माण केली पाहीजे असे मान्यवरांनी मनोगतात सांगितले. यावेळी कार्यालय अधिक्षक माणिक वानखेडे, ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार, स्वच्छता निरीक्षक किशोर सोनवणे, मनोज सोनवणे, प्रमोद गहीवड, विनायक पाकळे, पोपट देशमुख, कृष्णा कासार, विवेक देसले आदी उपस्थित होते.
दिवंगत राष्ट्रपती डॉ. कलाम जयंती सटाण्यात वाचन दिवस म्हणून साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 8:45 PM
सटाणा : येथील पालिकेच्या महात्मा गांधी वाचनालयात दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पि. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करून आजचा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
ठळक मुद्दे पालकांनी मुलांना चनाची आवड निर्माण केली पाहीजे