लासलगांव : गेल्या दोन दिवसापासून लासलगाव व परिसरामध्ये सतघर पाऊस सुरू असून ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या हंगामातील लासलगाव मध्ये ११.५ इंच पाऊस झाल्याची नोंद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पर्जन्यमापक यंत्राद्वारे झाली आहे.पहाटेपासूनच लासलगांव मध्ये संततधार पाऊस पडत असल्याने लासलगाव येथील आठवडे बाजारामध्ये याचा परिणाम दिसून आला. चांदोरी आणि सायखेडा मध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. लासलगाव येथील क्र ांती मित्र मंडळ आणि आरएसएस यांच्या कार्यकर्त्यांनी सुमारे पाचशे लोकांनाा पुरेल इतका स्वयंपाक आणि फळे पाठविण्यात आली आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिककडे जाणारी वाहने व रेल्वे वाहतूक देखिल विस्कळीत झालीे आहे.(फोटो ०४ लासलगाव पाऊस)