पिंपळगाव बसवंत : वेळ दुपारची.. एक गाय मोठमोठ्याने हंबरत फोडत पोलीस ठाण्याच्या आवारात शिरली. तिच्या हंबरण्याने ड्युटीवरील पोलीस कर्मचारीही बुचकाळ्यात पडले.क्षणार्धात काही कर्मचाºयांना सर्व प्रकार समजला आणि त्यांनी कुणाच्याही आदेशाची वाट न पाहता थेठ लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ती गोमाताही शांत झाली आणि प्रेमाने तिने आपल्या बाळाला जवळ घेतले. पोलिसांनीही तिला चारापाणी करून मालकाच्या स्वाधीन केले. मंगळवारी पिंपळगाव बसवंत परिसरात ही घटना घडली.मंगळवारी दुपारच्या वेळेत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याजवळील रस्त्यावर एका गाईने गोंडस वासराला जन्मदिला; मात्र परिसरातील मोकाट कुत्रे या नवजात वासराच्या मागे लागले. हे पाहताच गाय हंबरडा फोडत थेट पोलीस ठाण्याच्या आवारात धावली. पोलीस कर्मचारी अनिल बोराळे, एकनाथ पवार, तुषार झाल्टे यांनी हा प्रकार पाहिला आणि कुत्र्यांच्या टोळीवर लाठीचार्ज करत त्यांना पळवून लावले. त्यानंतर गाईनेही सुटकेचा नि:श्वास सोडला. अन् वासराला जवळ घेतले.गोरक्षक संजय सोनवणे, संकेत बुरड, विजय गायकवाड यांनी गाय व वासराला चारापाणी केला. तिच्या मालकाचा शोध घेऊन गाय व वासरू त्यांच्या स्वाधीन केले.
गोमातेची धावपळ अन् पोलिसांचा लाठीचार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:54 AM
पिंपळगाव बसवंत : वेळ दुपारची.. एक गाय मोठमोठ्याने हंबरत फोडत पोलीस ठाण्याच्या आवारात शिरली. तिच्या हंबरण्याने ड्युटीवरील पोलीस कर्मचारीही बुचकाळ्यात पडले.
ठळक मुद्देएक गाय मोठमोठ्याने हंबरत फोडत पोलीस ठाण्याच्या आवारात शिरली पोलिसांनीही तिला चारापाणी करून मालकाच्या स्वाधीन