घोटी : नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीने सोमवारी युवक काँग्रेसच्या युवा जागर यात्रेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित यांच्या हस्ते करण्यात आला. घाटनदेवी मंदिरात नारळ वाढवून संपूर्ण जिल्हाभरात संपर्क अभियानाच्या माध्यमातून झंझावात निर्माण करण्याचा संकल्प देखील यावेळी उपस्थितांनी केला. शहराध्यक्ष आकाश छाजेड,नाशिक लोकसभा अध्यक्ष राहुल दिवे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस स्वप्निल पाटील, एनएसयुआय प्रदेश सरचिटणीस नितीन काकड, शहराध्यक्ष सचिन भुजबळ, इगतपुरी विधानसभा अध्यक्ष भास्कर गुंजाळ यांच्या उपस्थितीत या कार्यक्र माचा शुभारंभ जल्लोषात करण्यात आला. यावेळी गावित यांनी सांगितले की, संपूर्ण जिल्ह्यात तालुकास्तरावर मेळावे व बैठका घेतल्या जातील व समारोप जिल्ह्याचा संयुक्तपणे मेळावा घेऊन करण्यात येईल तर जिल्हाभरात राहुल गांधींचे धोरणात्मक विचार पोहोचवून नवीन फळी तयार करण्याचा मानस असल्याचे इगतपुरी विधानसभा अध्यक्ष भास्कर गुंजाळ यांनी सांगितले. जिल्हा व शहर काँग्रेसला असे प्रयोग नविन नाही मात्र तरु णांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नक्कीच काँग्रेसला अच्छे दिन येतील असा विश्वास सामान्य कार्यकर्ता व्यक्त करत आहे. या कार्यक्र मास अर्जुन जाधव, तात्या पाटील भागडे, मच्छिन्द्र दोंदे,विजय खातळे,विजय कडू,युवराज कुंदे,संतोष भागडे,संदिप भागडे,गुरु नाथ भागडे, किरण रायकर, योगेश सुरु डे, भूषण डामसे, रमेश देवगिरे, कैलास घारे, अर्जुन जोशी, निलेश भोर, मुद्क्सर शेख, मोहन भागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (१४ घोटी)
कॉँग्रेसच्या युवा जागर यात्रेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 2:02 PM