वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे जिल्हा क्रीडाविभाग, नाशिक यांच्याकडून उपलब्ध झालेल्या सात लाख रूपयांच्या निधीतून संरक्षक भिंतीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. वडझिरे ग्रामपंचायतमार्फत व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके यांनी जिल्हा क्रीडा विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हा निधी मंजुर करून आणला आहे. ग्रामपंचायत व शहिद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात ग्रामपंचायतीच्यावतिने वृक्ष रोपण करण्यात आले. तसेच या परिसरात अभ्यासिका असल्यामुळे या परिसरात शांतता आबाधित रहावी व परिसर स्वच्छ रहावा यासाठी ग्रामपंचायत मार्फत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा क्रीडा विभागातून सुमारे ९६ मिटर काम होणार असुन उरलेले कामासाठी ग्रामपंचायतीने व्ही. एन. नाईक संस्थेकडे पाठपुरावा केला आहे. हे काम पूर्ण झाल्यास गावातल्या विकासात भर पडेल असा विश्वास बोडके यांनी व्यक्त केला. यावेळी सरपंच अंबादास बोडके, उपसरपंच छाया नागरे, भिमराव दराडे, पांंडुरंग बोडके, संजय बोडके, बाजीराव बोडके, गोरख ठोंबरे, विलास बोडके, अप्पा दराडे, योगेश दराडे, भास्कर गिते, विश्वनाथ बोडके, बस्तिराम दराडे, सोमनाथ बोडके, मुख्याध्यापक विलास सांगळे, देविदास कुटे, संदिप आंबेकर आदि उपस्थित होते.फोटो क्र.- 07२्रल्लस्रँ02फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील माध्यमिक विद्यालय परिसरात संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी सरपंच अंबादास बोडके, अर्जुन बोडके, उपसरपंच छाया नागरे, भिमराव दराडे, पांंडुरंग बोडके, संजय बोडके, बाजीराव बोडके, गोरख ठोंबरे, विलास बोडके, अप्पा दराडे, योगेश दराडे, भास्कर गिते, विश्वनाथ बोडके, बस्तिराम दराडे आदी.
वडझिरे येथे संरक्षक भींत बांधकामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 6:25 PM
वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे जिल्हा क्रीडाविभाग, नाशिक यांच्याकडून उपलब्ध झालेल्या सात लाख रूपयांच्या निधीतून संरक्षक भिंतीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. वडझिरे ग्रामपंचायतमार्फत व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके यांनी जिल्हा क्रीडा विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हा निधी मंजुर करून आणला आहे.
ठळक मुद्देपरिसरात ग्रामपंचायतीच्यावतिने वृक्ष रोपण करण्यात आले.