जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथे शनिवारी (दि.२४) जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येऊन शुभारंभ करण्यात आला.जानोरी तसेच परिसरातील वाढती रुग्णसंख्या व लोकसंख्या लक्षात घेता येथील ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना इतरत्र लसीकरणासाठी जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्या सारिका नेहरे, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे व जानोरी ग्रामपंचायत प्रशासन यांच्या प्रयत्नाने येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी मोहाडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी लोणे, डॉ. योगेश गोसावी, उपसरपंच गणेश तिडके, मा. जि.प. सदस्य शंकर काठे, सुनील घुमरे, विष्णुपंत काठे, निवृती घुमरे, शंकरराव वाघ, तलाठी किरण भोये, ग्रामसेवक के.के. पवार आदी उपस्थित होते.
जानोरी येथे कोविड लसीकरणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 00:18 IST
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथे शनिवारी (दि.२४) जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येऊन शुभारंभ करण्यात आला.
जानोरी येथे कोविड लसीकरणाचा शुभारंभ
ठळक मुद्दे जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र