सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या १३०व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रोत्सवास बुधवारपासून विविध कार्यक्रमांनी प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता बागलाणचे प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे व पत्नी स्नेहा धिवरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड व अरुणा बागड, नगराध्यक्ष सुनील मोरे व योगीता मोरे, विश्वस्त धर्मा सोनवणे व कमळाबाई सोनवणे यांच्या हस्ते देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येऊन महाआरती करण्यात आली.बुधवारी पहाटे ३ वाजेपासूनच आरम नदीच्या तीरावरील देवमामलेदारांच्या मंदिरात भारुडे, भजने आदी कार्यक्रम पार पडले. पहाटेच्या निरव शांततेत ध्वनिक्षेपकावरून वाजविण्यात येणाºया शहनाई व सनई चौघड्यामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. महापूजेसाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. महाआरतीनंतर महाराजांच्या दर्शनसाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महापूजेनिमित्त श्री यशवंतराव महाराज मित्रमंडळातर्फे दिवसभरात मंदिरात दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी ६०० किलोंची साबुदाणा खिचडी महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आली. दरम्यान, येथील बागलाण तहसील कार्यालयातील देवमामलेदार महाराजांनी ज्या खुर्चीवर बसून जनतेची सेवा केली, त्या खुर्चीचे प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे व स्नेहा धिवरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.मंदिरातील देवमामलेदारांच्या मूर्तीला पहाटे ४ वाजता सालाबादप्रमाणे कॉँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, भारती कदम, राजेश भोपळे, श्रद्धा भोपळे, पोलीस नाईक देवराम खांडवी व नंदा खांडवी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला, नंतर महाआरती करण्यात आली. तुषार कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. दुपारी ३ वाजता पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे व पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या सपत्नीक उपस्थितीत महाराजांच्या रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. या रथयात्रेला १९२१ पासूनची परंपरा आहे. या रथाचे शिल्पकार कै. भिका रतन जगताप आहेत. रथाचे वैशिष्ट्य म्हणजे पंधरा फूट उंचीचा हा कोरीव रथ आहे. विशेष म्हणजे जगताप यांनी पायाचा स्पर्श न करता तीन वर्षे लाकडावर काम करून रथाची निर्मिती केली आहे. त्यानंतर १९२१ मध्ये हा रथ देवमामलेदारांच्या चरणी अर्पण केला. या रथयात्रेच्या परंपरेला आज ९६ वर्षं पूर्ण होत आहे. महापूजेचे पौरोहित्य राजेंद्र कुलकर्णी, परिमल जोशी, मकरंद पाठक, संजय चंद्रात्रे प्रा. धनंजय पंडित, संजय चंद्रात्रे, पीयूष गोसावी, आबा मुळे, पंकज इनामदार, बाळा पाठक, विनायक कुलकर्णी, रोहित देशपांडे, बबन मुळे, भास्कर जोशी, गजानन जोशी, अभय चंद्रात्रे, कौस्तुभ पिसोळकर, ऋषी चंद्रात्रे आदींनी केले. शरद गुरव आणि पप्पू गुरव यांनी सनई -चौघड्याचे वादन केले. यावेळी दादाजी सोनवणे, रमेश देवरे, राजेंद्र भांगडिया, रमेश सोनवणे, बाबूराव सोनवणे, कौतिक सोनवणे, हेमंत सोनवणे, स्वप्नील बागड, नगरसेवक महेश देवरे उपस्थित होते. आदिवासी नृत्याने वेधले लक्ष ...देवमामलेदार महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त बुधवारी सायंकाळी ५ वाजता मालेगाव ग्रामीणचे सहायक पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक रथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महापूजेचे मानकरी प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, प्रांताधिकारी प्रवीण महाजन, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांच्या हस्ते रथ ओढून चावडी रोडने रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत लेझीम पथक,टिपरी पथक सहभागी झाले होते. आदिवासी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले. ढोलताशाच्या गजरात रथ कॅप्टन अनिल पवार चौक मार्गाने सरकारी दवाखाना, शिवाजी चौक, टीडीए रोड, मल्हार रोडवरून पोलीस चौकी मार्गे सोनार गल्ली, महालक्ष्मी मंदिर असा नेण्यात आला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी सडा आणि रांगोळ्या घालून रथाचे स्वागत केले. मिरवणुकीदरम्यान भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी पाण्याची व प्रसादाची व्यवस्था केली होती. येवला येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी यशवंतराव महाराजांचा जिवंत देखावा सादर केला. हा देखावा यंदाच्या रथ मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले.
देवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ; विविध कार्यक्र मांचे आयोजन : रथ मिरवणुकीचे आकर्षण; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:49 AM
सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या १३०व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रोत्सवास बुधवारपासून विविध कार्यक्रमांनी प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता बागलाणचे प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे व पत्नी स्नेहा धिवरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड व अरुणा बागड, नगराध्यक्ष सुनील मोरे व योगीता मोरे, विश्वस्त धर्मा सोनवणे व कमळाबाई सोनवणे यांच्या ...
ठळक मुद्देदेवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ; विविध कार्यक्र मांचे आयोजन : रथ मिरवणुकीचे आकर्षण; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा