नाशिक : द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक आयोजित द्राक्ष विज्ञान अभियानाचा शुभारंभ गुणनियंत्रक अधिकारी उल्हास ठाकूर यांच्या हस्ते झाला. ठाकूर म्हणाले, द्राक्ष उत्पादकांनी शासन मान्यताप्राप्त कृषी औषधे व खते वापरावीत त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होईल, असे सांगून बनावट किंवा भेसळ औषधांबाबत माहिती मिळाल्यास कृषी विभागास त्वरित कळविण्याचे आवाहन ठाकूर यांनी केले.प्रगतिशील द्राक्ष उत्पादक सदू शेळके म्हणाले, युवा शेतकऱ्यांनी संघटितपणे एकत्र येऊन द्राक्षशेतीचा विकास केला पाहिजे. द्राक्ष विज्ञान मंडळ हा सुमारे चार हजार शेतकºयांचा गु्रप असून, द्राक्ष पिकाच्या उत्पादनवाढीसाठी वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी काम करत आहे. शुभारंभप्रसंगी साहिल न्याहारकर, चंद्रकांत बनकर, ग्रेप मास्टरचे सुनील शिंदे, एन. डी. पाटील, मनोज जाधव, सुनीता निमसे, अनिल ढिकले, आनंद ढिकले, रामदास मोरे, बाळासाहेब राजोळे, विजय राजोळे, डोळे, मयूर जाधव, गणेश कानमहाले, प्रमोद जाधव, तुषार आहेर, गोविंद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.प्रत्यक्षात बागेत जाऊन पाहणी करून तंत्रज्ञान अवगत करण्याचा हा अत्यंत स्तुत्य उपक्र म आहे. द्राक्ष विज्ञान अभियानात असंख्य द्राक्ष उत्पादक व महिला द्राक्ष उत्पादक सहभागी झाल्या होत्या. द्राक्ष विज्ञान अभियानाचे सूत्रसंचालन द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिकचे समन्वयक डॉ. वसंत ढिकले यांनी केले.
द्राक्ष विज्ञान अभियानाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 1:39 AM