सुरगाणा : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जनसेवा मंडळा मार्फत मोफत जनसेवा भोजन योजनेचा शुभारंभ तालुक्यातील बाºहे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.जनसेवा मंडळ सुरगाणा-पेठ यांचे वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या मुहूर्तावर आदिवासी भागातील बाºहे, ठाणगांव, बेडसे, आंबूपाडा, आंबोडे, खोकरविहीर येथील सरकारी दवाखान्यात मुक्कामी असणाऱ्या, प्रसुती झालेल्या मातांसाठी व सोबत राहणाºया एका व्यक्तीसाठी मोफत जनसेवा भोजन देणार आहे.या कार्यक्र मास बाºहे ग्रामीण रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी देवानंद चौधरी, देवा गृप फाऊंडेशन नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख सूरज वैष्णव, आदिवासी युवा प्रतिष्ठान बाºहेचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, मुरलीधर चौधरी, युवा फाऊंडेशन पदाधिकारी, जनसेवा मंडळाचे जनसेवक कमलेश वाघमारे, मनोहर जाधव, दिलीप महाले, कल्पेश वाघमारे, सिताराम कामडी, प्रवीण भडांगे, भरत जाधव, सिताराम घोरपडे, रघुनाथ घोरपडे, धनाजी चौधरी, धनाजी लहरे, पंडित गवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त जनसेवा भोजन योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 6:47 PM
सुरगाणा : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जनसेवा मंडळा मार्फत मोफत जनसेवा भोजन योजनेचा शुभारंभ तालुक्यातील बाºहे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
ठळक मुद्देप्रसुती झालेल्या मातांसाठी व सोबत राहणाºया एका व्यक्तीसाठी मोफत जनसेवा भोजन