कळवण : तालुक्यातील देसराणे आणि निवाणे येथे राज्य शासनाच्या वतीने किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत मका खरेदी-विक्रीचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाद्वारे देसराणे व निवाणे येथे तहसीलदार बी. ए. कापसे, मविप्रचे माजी संचालक नारायण हिरे, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर व मान्यवरांच्या उपस्थितीत मका पोत्यांचे व वजनकाट्याचे विधिवत पूजन करण्यात आले. खेडगाव येथील अमृता वाघ यांचा मका खरेदी करून शुभारंभ करण्यात आला.शासनाच्या किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेंतर्गत शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी करून कळवण तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शासनाकडे केली होती. पवार यांच्या मागणीची शासनाने दखल घेऊन कळवण तालुक्यात दळवट, जयदर, तिºहळ, देसराणे, निवाणे येथे शासकीय मका खरेदीसाठी परवानगी दिली आहे.समाधानकारक पावसामुळे यंदा खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रब्बी हंगामातील मका विक्रीला अडथळा आल्याने किमती घसरल्या. आजमितीस अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मका विक्र ी केलेली नाही. रब्बी हंगामातील मक्याची कणसांचीसाठवणूक केली आहे. बाजार समितीत मक्याला प्रतिक्विंंटल हजार-अकराशे रुपये दर मिळत आहे, तर खासगी व्यापारी शिवारखरेदीमध्ये हजार रुपये क्विंंटल दराने खरेदी करीत आहेत. त्यामुळे खरीप हंगामात दोन हजार रु पयांपर्यंत जाणाºया मका दरात घट झाल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेंतर्गत शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ देसराणे व विसापूर सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आला असून, दळवट, जयदर, तिºहळ येथे मका खरेदी करण्यात येणार आहे.
-------------------------------
सध्या मक्याला दर नसल्याने व बाजारपेठ बंद असल्याने माल कुठे विकावा या समस्येने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कळवण तालुक्यात शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. आधारभूत निश्चित दर प्रतिक्विटंल १७६०रु पये इतका निश्चित करण्यात आला आहे.- नितीन पवार, आमदार, कळवण