नाशिक: जिल्हा परिषद आरोग्य विभाग मार्फत राबविल्या जाणाऱ्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा परिषदेचेचे अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शित करून उद्घाटन करण्यात आले.'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेची जनजागृती समाजात चांगल्या प्रकारे व्हावी व काय काळजी घ्यावी याविषयी अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये हे या पोस्टरमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. मोहीम काळामध्ये हे पोस्टर विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्'ातील प्रत्येक घरी आरोग्य कर्मचाºया मार्फत भेट देण्यात येणार असून प्रत्येक कुटुंबाची माहिती अॅप मध्ये भरली जाणार आहे. तसेच कोमारबीड व सारीच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात घरातील प्रत्येक व्यक्तीचे तपमान व आजारी वृद्ध व्यक्तींचे रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येणार असून ताप किंवा कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या पेशंटला वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासून संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी वरील प्रतिबंधात्मक उपाय योजना शासनाने केली असून या मोहिमेअंतर्गत महिला बालकल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग करीत आहे. जिल्'ात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात राहून मृत्यूदर कमी व्हावा यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी आपल्या घरी येणाºया सर्वेक्षण करणाºया आरोग्य कर्मचारी व आरोग्य दूतांना योग्य प्रकारे माहिती देण्यात येऊन सहकार्य करावे असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.