येवला (जि. नाशिक) : महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना पाडव्यानिमित्त अनोखी भेट दिली असून, सर्व प्रकारच्या वयोगटातील महिलांसाठी एसटीच्या तिकीट दरामध्ये ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी दिनांक १७ मार्च रोजी सुरू झाली असून, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, येवला आगार यांच्यावतीने या योजनेचा शुभारंभ येवला आगारातून करण्यात आला.
आगाराची पहिली बस नाशिक येथे रवाना होत असताना या बसमध्ये बसलेल्या महिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात तिकिटाचे दर आकारण्यात आले. दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात तिकीट दिल्याने त्यांना सुखद धक्का बसला.
या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा व राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करावा, असे आवाहन येवला आगाराचे आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे यांनी केल आहे