उमराणे : विजयादशमी (दसरा)च्या मुहूर्तावर येथील स्व.निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत नविन लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. कुंभार्डे येथील शेतकरी सावळीराम ठाकरे यांच्या मुहूर्ताच्या बैलगाडीतुन आणलेल्या कांद्यास सर्वोच्च ११.१५१ रु पये भाव मिळाला.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी विजयादशमी (दसरा) च्या मुहूर्तावर नविन लाल पावसाळी कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात येतो. या रिवाजाप्रमाणे यावर्षीही सकाळी अकरा वाजता नवीन लाल कांदा खरेदी विक्र ीचा शुभारंभ करण्यात आला. सर्वप्रथम समितीच्या कार्यालयातील देव देवताच्या प्रतिमेचे पुजन बाजार समितीच्या मुख्य प्रशासक सोनाली देवरे, माजी सभापती विलास देवरे व संचालक मंडळ तसेच कांदा व्यापारी प्रविण देवरे, महेंद्र मोदी, प्रविण बाफणा, सुनिल देवरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.बाजार समितीचे सचिव नितीन जाधव यांच्या हस्ते बैलगाडीतुन विक्र ीस आलेल्या नविन कांद्याचे पुजन करु न कांदा उत्पादक शेतकरी सावळीराम ठाकरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर लिलावास सुरु वात करण्यात आली. यावेळी गजानन आडतचे संचालक व कांदा व्यापारी संजय देवरे यांनी सर्वोच्च बोली लावत ११.१५१ रु पये दराने नविन लाल कांदा खरेदी केला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रथम व सर्वोच्च दराने कांदा खरेदी करण्याचा बहुमान त्यांनीच राखला.शुभारंभाप्रसंगी कांदा व्यापारी संदेश बाफणा, संतोष बाफणा, साहेबराव देवरे, रामराव ठाकरे, शैलेश देवरे, मुन्ना अहेर, सचिन देवरे, पांडुरंग देवरे, रमेश वाघ, कैलास देवरे, मोहन अहिरे, सहसचिव तुषार गायकवाड तसेच व्यापारी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान चालूवर्षी सुरु वातीपासूनच जोरदार पाऊस असल्याने लाल (पावसाळी) कांदा लागवडीवर याचा विपरीत परिणाम होऊन लाल काद्यांच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे.असे असतानाच लागवड झालेल्या कांद्यांनाही गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने झोडपल्याने हे कांदे खराब झाले आहेत. त्यामुळे बाजारात नविन लाल कांद्याची कमी आवक आली आहे.बाजार आवारात ११ बैलगाडी, २१५ पिकअप, व २१० ट्रक्टर आदी वाहनांतून सुमारे चार ते पाच हजार क्विंटल कांदाआवक झाल्याचा अंदाज असुन बाजारभाव कमीत कमी ११००रु पये, जास्तीत जास्त ११.१५१ रु पये, तर सरासरी भाव ३००० रु पये इतका होता.चौकट...आगामी काळात बाजारात लाल कांद्याची किती आवक होते यावरून शेतकरी बांधवांनी चाळीत साठवून ठेवलेला परंतु काही अंशीच शिल्लक असलेल्या उन्हाळ (गावठी) कांद्यांचे दर अवलंबून असुन सध्यातरी लाल कांद्याची आवक महिनाभर वाढेल अशी अपेक्षा नसल्याने उन्हाळी कांद्याचे दर तेजीतच राहणार असल्याची शक्यता येथील कांदा व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.सोमवारपासुन उन्हाळी कांद्याचे लिलाव बेमुदत बंद ; शासनाने घाऊक कांदा व्यापाऱ्यांना २५ टन पर्यंत कांदा माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने सद्यस्थिती जवळपास सर्वच कांदा व्यापाºयांकडे तीन ते चार टन कांदा पडुन आहे. त्यामुळे तो माल निकाशी होईपर्यंत व्यापारी वर्ग लिलावात सहभागी होणार नसल्याने पुुढील आदेश येईपर्यंत लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले.
उमराणे बाजार समितीत लाल कांदा खरेदी विक्र ीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 3:28 PM
उमराणे : विजयादशमी (दसरा)च्या मुहूर्तावर येथील स्व.निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत नविन लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. कुंभार्डे येथील शेतकरी सावळीराम ठाकरे यांच्या मुहूर्ताच्या बैलगाडीतुन आणलेल्या कांद्यास सर्वोच्च ११.१५१ रु पये भाव मिळाला.
ठळक मुद्देमुहूर्ताच्या कांद्याला ११.१५१ रु पये भाव ; पावसामुळे कांदा खराब झाल्याने आवकेत घट