उमराणे : विजयादशमी (दसरा) च्या मुहूर्तावर येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीत नविन लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.तिसगाव येथील शेतकरी नामदेव कृष्णा अहिरे यांच्या मुहूर्ताच्या बैलगाडीतुन आणलेल्या कांद्यास सर्वोच्च ५००१ रु पये भाव मिळाला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी विजयादशमी (दसरा) च्या मुहूर्तावर नविन लाल पावसाळी कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात येतो. त्या रिवाजाप्रमाणे यावर्षीही दुपारी बारा वाजता नविन लाल कांदा खरेदी विक्र ीचा शुभारंभ करण्यात आला. सर्वप्रथम समितीच्या कार्यालयातील देव देवताच्या प्रतिमेचे पुजन बाजार समि तीचे प्रशासक व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशासक संजय एस.गिते यांच्या हस्ते बैलगाडीतुन विक्र ीस आलेल्या नविन कांद्याचे पुजन करु न कांदा लिलावाचा शुभारंभ केला. तसेच कांदा उत्पादक शेतकरी नामदेव अिहरे यांचा शाल श्रिफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर लिलावास सुरु वात होऊन गजानन आडतचे संचालक व व्यापारी संजय खंडेराव देवरे यांनी सर्वोच्च बोली लावत ५ हजार १ रु पये भावाने नविन लाल कांदा खरेदी केला.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रथम व सर्वोच्च दराने कांदा खरेदी करण्याचा बहुमान त्यांनीच राखला. शुभारंभाप्रसंगी कांदा व्यापारी प्रविणलाल बाफणा,संदेश बाफणा, साहेबराव देवरे,रामराव ठाकरे,शैलेश देवरे, महेंद्र मोदी,सुनिल देवरे, प्रविण देवरे,मुन्ना अहेर, पांडुरंग देवरे, रमेश वाघ,अविनाश देवरे, मोहन अहिरे, समितीचे माजी उपसभापती महेंद्र पाटील, मधुकर पाटील, समतिीचे सचिव नितिन जाधव,सहसचिव तुषार गायकवाड तसेच बहुसंख्य व्यापारी, शेतकरी उपस्थित होते. दरम्यान चालूवर्षी पावसाने सर्वत्र पाठ फिरविल्याने लाल (पावसाळी) कांदा लागवडीवर याचा विपरीत परिणाम झाला आहे. पाण्याअभावी लागवड झालेले कांदे सोडुन देण्याची वेळ शेतकº्यांवर आल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी बाजारात नविन लाल कांद्याची कमी आवक आली आहे. बाजार आवारात १०बैलगाडी,२५० पिकअप, व १८५ ट्रक्टर आदी वाहनांतून सुमारे तिन ते चार हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असुन बाजारभाव कमीत कमी एकहजार रु पये, जास्तीत जास्त पाचहजारएक रु पये, तर सरासरी भाव१८०० रु पये इतका होता. दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रत्येक व्यापारी नविन लाल कांदा खरेदी करून नविन व्यापारास सुरु वात करत असल्याने खरेदी केलेल्या कांद्याचे प्रत्येक खळ्यात पुजन करण्यात येते. @ चौकट- आगामी काळात बाजारात लाल कांद्याची किती आवक येते यावरून शेतकरी बांधवांनी चाळीत साठवून ठेवलेला परंतु काही अंशीच शिल्लक असलेल्या उन्हाळ (गावठी) कांद्यांचे दर अवलंबून असुन सध्यातरी पाण्याअभावी लाल कांद्याची आवक वाढेल अशी अपेक्षा नसल्याने उन्हाळ कांद्याचे दर तेजीतच राहणार असल्याची शक्यता येथील व्यापाº्यांनी वर्तिवली आहे.