नाशिक : रविवार दि ७ जानेवारी २०१८ रोजी होणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय व दहाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथान स्पर्धेचा धावन मार्गमापनाचा शुभारंभ नाशिकचे जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक व सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. मविप्र संस्थेच्या वतीने डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने मविप्र मॅरेथान स्पर्धा ९ वर्षापुर्वी सुरु झाली . ७ जानेवारी रोजी स्पर्धा मविप्र मॅरेथान चौक येथून सुरु होऊन धोंडेगावपर्यंत व परत मॅरेथान चौक असा स्पर्धेचा मार्ग असणार आहे .जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना २०१८ हे वर्ष केंद्रीय क्रीडा मंत्री हर्षवर्धन राठोड यांनी क्रीडा वर्ष म्हणुन घोषित केले असुन मविप्र मॅरेथान स्पर्धेने नाशिकच्या २०१८ क्रीडा उपक्रमांची ची दमदार सुरुवात होणार असुन शासनाच्या वतीने मविप्र मॅरेथान स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगुन नशिक मविप्र मॅरेथान स्पर्धा देशात नाशिक शहराची एक वेगळी ओळख निर्माण करीत आहे ,संस्था गेल्या ०९ वर्षापासून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करीत असून जास्तीत जास्त नाशिककरांनी मॅरेथान स्पर्धेत सहभागी व्हावे असे, आवाहन रविंद्र नाईक यांनी केले .
दहाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथान स्पर्धेचा धावन मार्गमापनाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 1:56 PM
नाशिक : रविवार दि ७ जानेवारी २०१८ रोजी होणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय व दहाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथान स्पर्धेचा धावन मार्गमापनाचा शुभारंभ नाशिकचे जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक व सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. मविप्र संस्थेच्या वतीने डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने मविप्र मॅरेथान स्पर्धा ९ वर्षापुर्वी सुरु झाली . ...
ठळक मुद्दे०९ वर्षापासून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन ७ जानेवारी रोजी स्पर्धा मविप्र मॅरेथान चौक येथून स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय व नामवंत खेळाडु प्रमुख पाहुणे मॅरेथान स्पर्धेच्या नोंदणीसाठी अॅप तयार