नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव धान्य दुकानांमार्फत लोह व आयोडिमयुक्त मीठ वाटप योजनेचा नाशिक विभागातील शुभारंभ अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला.महिलांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लोह आणि आयोडिनयुक्त न्यूट्रीनेशन मीठ वाटप करण्यात येणार आहे. हे मीठ रास्तभाव दुकानांमध्ये १४ रुपये प्रतिकिलोप्रमाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. न्यूट्रीनेशन हे मीठ महिलांमधील रक्ताक्षयाची कमी, अशक्तपणा यासाठी उपयुक्त आहे. जगातील सर्व सामाजिक, आर्थिक गटातील लोक वर्षभर मिठाचा वापर करतात. मीठ हे स्वयंपाक करण्याचा मूलभूत घटक आहे त्यामुळे बालक, प्रौढ, ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या सुदृढ आरोग्यासाठी न्यूट्रीनेशन मीठ अत्यंत फायदेशीर असल्याचे बापट यांनी सांगितले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, उपायुक्तप्रवीण पुरी, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन, गणेश अय्यर आदी उपस्थित होते.
रेशनमधून मीठ वाटपाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 1:22 AM