लासलगाव : येथे शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लाभार्थीला भाजी, पोळी आणि वरणभात असलेली पाकीट स्वरूपात पहिली थाळी देण्यात आली.कार्यक्रमास बाळासाहेब लोखंडे, लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना तोडमल, शरद पाटील, संतोष ब्रह्मेचा, गुणवंत होळकर, दिनेश जाधव, प्रिन्स भल्ला, संजय बिरार, अजय माठा, कैलास महाजन, संतोष राजोळे, वैशाली जाधव आदी उपस्थित होते.
वेळुंजे : हरसूल येथे सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी पहिल्याच दिवशी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तसेच लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर, विद्यार्थी उपाशी राहू नये तसेच गरिबांच्या उपासमारीची शक्यता लक्षात घेऊन हरसूल येथे शिवभोजन थाळी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.तालुका पातळीवरील शिवभोजन थाळी हा उपक्र म हरसूलसारख्या ग्रामीण भागात राबविल्याने नक्कीच फायदा होणार आहे. हरसूल येथील शनिमंदिर चौकाच्या शेजारील (गोडाउन पाडा) येथील ग्रामपंचायतीच्या एका गाळ्यात या शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला आहे.आदिवासी भागात या पाच रु पये शिवभोजन थाळीचा भुकेल्या व गरजू नागरिकांना या उपक्रमाचा मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी विनायक माळेकर, पंचायत समतिी सभापती मोतीराम दिवे, सहायक पोलीस निरीक्षक टकले उपस्थित होते.