नाशिक : सामाजिक जाणिवेतील प्रश्न आणि ज्वलंत विषयाचा वेध घेणाऱ्या दोन दिवसीय ऋतम शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी सामाजिक संदेश देणाऱ्या, तंत्रज्ञानावर आधारित तसेच भयपट अशा विविध शॉर्ट फिल्म्सचे स्क्रिनिंग करण्यात आले.रोजच्या जगण्यातील विषयाचा कॅमेºयाच्या नजरेतून आगळा वेध घेणाºया तरु णांच्या प्रयत्नाला व्यासपीठ देण्यासाठी आयोजित केलेल्या शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे उद््घाटन पार पडले. या फेस्टिव्हलला नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद लाभला.तरुणांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे, या हेतूने या ऋतम शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणच्या युवा फिल्म्स मेकर्सने या फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला आहे. कमाल ३० मिनिटांची कालमर्यादा असलेल्या एकूण २५ शॉर्ट फिल्म्सचे स्क्रिनंग या फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. सुमनचंद्र ग्रुप आणि ऋतम प्रॉडक्शन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलची सांगता रविवारी होणार आहे. नाशिक व नाशिकबाहेरील फिल्ममेकर्सने बनविलेल्या सुमारे २३ फिल्सचे स्क्रि निंग या फेस्टिव्हलमध्ये होणार आहेत. त्यापैकी १४ फिल्म्स शनिवारी दाखविण्यात आल्या.चित्रमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाशेजारच्या सुमनचंद्र क्लबमध्ये आयोजित या फेस्टिव्हलच्या दुसºया दिवशी म्हणजे रविवारी सकाळच्या सत्रात उर्वरित फिल्म्स दाखविण्यात येणार आहेत, तर दुपारी ४ वाजता शिवाजी साटम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. यावेळी साटम यांची प्रकट मुलाखतही होणार आहे.
शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 1:13 AM
सामाजिक जाणिवेतील प्रश्न आणि ज्वलंत विषयाचा वेध घेणाऱ्या दोन दिवसीय ऋतम शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांच्या हस्ते झाले.
ठळक मुद्देसामाजिक विषय : अभिनेता शिवाजी साटम यांच्या हस्ते उद्घाटन