वरखेडा : दिडोरी तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकरी बांधवांनी खोरी फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजित उपबाजार आवारात आपला शेतमालाची प्रतवारी करत शेतमाल विक्रीस आणावा व उच्चांक बाजारभाव घेत आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन विधान परिषदेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी केले.वणी सापुतारा मार्गावरील खोरीफाटा येथील दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजित उपबाजार आवारात टोमॅटो व शेतमाल खरेदी-विक्री शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.शेतक-यांनी टोमॅटो व अन्य शेतमाल प्रतवारी करून विक्रीस आणावा जेणेकरून, दर्जेदार शेतमालाला चांगला बाजारभाव मिळेल. त्यामुळे शेतकरीबांधवांच्या आर्थिक उत्पन्नात नक्कीच भर पडेल, असेही ते म्हणाले. यावेळी सभापती दत्तात्रय पाटील यांनी प्रास्ताविक केले.दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक सभापती गणपत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरेदी-विक्री शुभारंभ करण्यात आला असून, यावेळी माजी आमदार धनराज महाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी उपसभापती अनिल देशमुख, दिंडोरी पंचायत समिती माजी सभापती एकनाथ गायकवाड, उपसभापती उत्तम जाधव, माजी उपसभापती आनंदा चौधरी, चिंधू पाटील पगार, बाजार समिती संचालक वाळू जगताप, गोपीनाथ पाटील, खोरी येथील सरपंच रामदास गायकवाड, संतोष पाटील, सम्राट राऊत व समितीचे सचिव जे. के. जाधव, शहा आदी उपस्थित होते.यावेळी वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.यावेळी टोमॅटो खरेदी-विक्री शुभारंभ करण्यात आला. शेतकरीबांधवांसह व व्यापारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
खोरीफाटा येथे टोमॅटो खरेदी विक्री शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 10:32 PM
वरखेडा : दिडोरी तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकरी बांधवांनी खोरी फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजित उपबाजार आवारात आपला शेतमालाची प्रतवारी करत शेतमाल विक्रीस आणावा व उच्चांक बाजारभाव घेत आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन विधान परिषदेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी केले.
ठळक मुद्देशेतकरीबांधवांसह व व्यापारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.