वणी : वणी सापुतारा रस्त्यावरील उपबाजार आवारात टमाटा खरेदी विक्री प्रणालीला आजपासून प्रारंभ करण्यात आला.उपबाजारात किमान दहा हजार ते पंचवीस हजार जाळीपर्यंत टमाटा खरेदी विक्र ी प्रतिदिन होते दिंडोरी चांदवड व कळवण तालुक्यातील उत्पादक टमाटा विक्र ीसाठी उपबाजारात आणतात.चामदरी येथील कुणाल कुंवर यांचा टमाटा शुभारंभ प्रसंगी विलास उंबरे यांनी 500 रु पये जाळी प्रमाणे खरेदी केला.दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समतिी दतात्रय पाटील अनिल देशमुख पंडित बागुल विलास निरगुडे ज्ञानेश्वर दवंगे जेके जाधव अपसुंदे मुख्तार शहा दौलत जाधव बबन गाडेकर संचालाल साखला विकास घुगे प्रवीण सोणवणे सुनिल जाधव सोमनाथ यादव संतोष बोडके व विविध मान्यवर उपस्थित होते.गुजरात दिल्ली मध्यप्रदेश बिहार उत्तरप्रदेश व तत्सम राज्यात हा टमाटा विक्र ीसाठी पाठविण्यात येतो. मोठी आर्थिक उलाढाल या माध्यमातुन होते जानेवारी मिहन्यापर्यत टमाटा आवक सुरू असते. प्रतवारी करून टमाटा विक्र ीसाठी आणणे रोख स्वरूपात व्यवहार पूर्तता करणे, पारदर्शी व्यवहाराची प्रणाली राबविणे या बाबीना अग्रक्र म देण्याचे आव्हान करण्यात आले.
टमाटा मार्केटचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 6:37 PM