लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव रोही : चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे विविध विकासकामांचा शुभारंभ व लक्ष्मीनगर रस्ता कॉँक्रिटीकरण लोकार्पण व जलयुक्त शिवार कामांना प्रारंभ करण्यात आला. शुक्रवारी चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या हस्ते हे कार्यक्रम झाले. उपसरपंच बाबाजी वाकचौरे व दत्तू पाटील यांनी जलयुक्त शिवार याविषयी माहिती दिलीे. मागील वर्षी पाऊस चांगला झाला; मात्र यावर्षीच्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींनी तळ गाठला आहे. पुढील वर्षी या भागातील जनतेला जलयुक्त शिवाराचा फायदा होऊ शकतो. यासाठी कामे करून घ्यावेत, असे मत जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कुंभार्डे यांनी व्यक्त केले. आमदार राहुल अहेर यांनी सांगितले की, जलयुक्त शिवार योजनेत चांदवड तालुक्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला असला तरी अजूनही यापेक्षा अधिक कामे होणे गरजेचे आहे. पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी नागरिकांनी जलयुक्तची कामे चांगली करुन घ्यावी. प्रत्येक व्यक्तीने या योजनेत सहभाग घेऊन कामे करुन घ्यावी. लोकवर्गणीत किंवा जनतेच्या सहभागातून डिझेल व जेसीबी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अहेर यांनी केले. यावेळी कृषी सहायक संजय मोरे, पर्यवेक्षक बी.व्ही. कांबळे यांनी जलयुक्त शिवार योजनेसह विविध शासकीय योजानींची माहिती दिली. कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील शेलार, ज्येष्ठ नेते राधाजी पाटील भोकनळ, शहाजी पाटील भोकनळ, अंबादास केदारे, सरपंच शिवाजी पाटील, उपसरपंच बाबाजी वाकचौरे, राजू पाटील, दत्तू पाटील, पोलीसपाटील अविनाश अहिरे, तुकाराम वाकचौरे, शिवाजी वाकचौरे, सीताराम ठाकरे, बाळासाहेब गिते, निवृत्ती वाकचौरे, मधुकर केदारे, अशोक वाकचौेरे, शिवाजी डुमरे, बाळासाहेब भोकनळ, भाऊसाहेब हिरे, अंबादास वाकचौरे आदी उपस्थित होते. अंबादास केदारे यांनी सूत्रसंचालन केले.तळेगावरोहीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ
By admin | Published: May 12, 2017 11:33 PM