कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील घोटी खु.येथील जाधववाडी, लोहरेवाडी येथे घोटी खु. ते जाधववाडी पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला.घोटी खु.येथे गावअंतर्गत देखील अंतर्गत पाईपलाईन चे काम पुर्ण झाले, तसेच रोंगटेवाडी येथेही पाईपलाईन काम पुर्ण झाले. व लोहरे वाडी येथील १०० मीटर. सिमेंट कॉक्रेटीकरण, भैरवनाथ मंदीर ते गोनीत मळा खडीकरण २ कि. मी काम सरपंच कैलास फोकणे यांनी ग्रामपंचायत निधीतुन पुर्ण केले.निसरड वाडीचा संघर्ष अखेर संपला...अनेक वर्षापासून आपल्या पाण्याचे स्वप्न उराशी बाळगुण जगणाऱ्या निसरड वाडीचे स्वप्न अखेर पुर्ण झाले. कित्येक वेळा ग्रामपंचायतकडे विनंती करुन तसेच प्रत्येक ग्रामसभेला महिलांनी हंडा मोर्चा काढुन देखील फक्त आश्वासने मिळाली होती, आता त्याची पुर्तता करण्यात आली.गेल्या अनेक दिवसांपासुन जाधववाडी येथे पाण्याची समस्या भेडसावत होती.अंतर्गत सुरुवातीची पाईपलाईन आहे. परंतु नियोजनअभावी पाणी पुरवठा व्यवस्थित होत नव्हता. आता या पाईपलाईनद्वारे नक्कीच आम्हाला फायदा होईल.- मनिषा निसरड ग्रा. पं. सदस्य, घोटी, खु. जाधववाडी.
जनतेने मला सेवा करण्याची जी संधी दिली आहे. ती मी परीपुर्णपणे पुर्णत्वास नेईल. आता जि काही कामे पुर्ण झालेली आहेत. व काही होत आहेत ती सर्व कामे ही ग्रामपंचायत निधीतील असुन यापुढे देखील विकासकामे करताना ग्रामपंचायत बरोबरच इतरही निधीसाठी प्रयत्नशील राहील. तसेच ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्यानेच हे सर्व होत आहे. विकासाचे धोरण कायम माझ्या डोळ्यासमोर राहीन व ते पुर्ण करण्यास आम्ही प्रयत्नशील राहु.- कैलास सुभाष, फोकणे, सरपंच घोटी खु.