लोकमत न्युज नेटवर्कवणी : दर्जेदार टमाटा उत्पादनात दिंडोरी तालूक्याचा नावलौकीक असुन उत्पादकांनी प्रतवारी करु न टमाटा विक्र ीसाठी आणण्याचे आव्हान दिंडोरी कृषी उत्पन्न बाजारसमीती सभापती दत्तात्रय पाटील यांनी केले.वणी सापुतारा रस्त्यावरील वणी उपबाजार येथे टमाटा लीलाव विक्र ीचा प्रारंभ करण्यात आला वीस किलो प्रत्येकी क्र ेटअसलेले ५७२ नगाची आवक झाली १७१ ते ७०० रु पये प्रति क्र ेटने टमाट्याचे व्यवहार पार पाडण्यात आले. अतिवृष्टीमुळे टमाट्याचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असुन उत्पादनात त्यामुळे घट आल्याने उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत तालूक्यात मोठ्या प्रमाणावर टमाट्याची लागवड करण्यात आली होती मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे हतबल झालेल्या उत्पादकांना यावेळेस भाव चांगला मिळण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.अनिल दादा देशमुख पंडित बागुल विलास कड विलास निरगुडे संजय ऊंबरे अंकीत चोरडीया संचालाल साखला शिवाजी दातीर मुख्तार शहा व्यापारी वर्ग व शेतकरी बांधव उपस्थित होते.